निवेदन : आनंदराव गेडाम यांच्यातर्फे पाठपुरावा आरमोरी : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यातील २५२ च्या वर नागरिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या आपातग्रस्तांना सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत मिळाली नाही. शासनस्तरावर पाठपुरावा करून आपातग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागील वर्षी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, कुऱ्हाडी, पिसेवडधा, कोरेगाव, डार्ली, नरचुली गावातील नागरिकांची घरे कोसळली होती. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे शेतीचेही नुकसान झाले होते. याबाबतची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचे पंचनामे केले होते व आर्थिक मदत देण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र सात महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. मार्चपूर्वी शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यास शेतकऱ्याने जे पीक कर्ज घेतले आहे, ते परत करण्यास मदत होईल. त्यामुळे मदतीची रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्यासह आनंदराव आकरे, दिलीप घोडाम उपस्थित होते.
अतिवृष्टीने घरांच्या पडझडीची मदत रखडली
By admin | Updated: March 8, 2017 02:17 IST