शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नावेने धोकादायक प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:47 IST

तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअनेक जीव गेले : प्राणहिता नदीवर पूल होऊनही नावेने केला जात आहे प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.महाराष्टÑ व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा मोठा पूल गोदावरी नदीवर बांधण्यात आला व या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या बसगाड्या गोदावरी नदीच्या पुलावरून आवागमन करीत आहेत. उन्हाळा व हिवाळ्यात सिरोंचा-कालेश्वर-पलगुला नजीक गोदावरी नदीपात्रात कच्चा रस्ता होता. त्यावेळी तेलंगणातील चिन्नूर, मंचेरियलकडे लोक बसने जात असायचे. मात्र आता पावसाळ्यात नदी दुथळी भरून वाहत असल्याने येथून रस्ता राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात बसने जायचे असेल तर महादेवपूरवरून बसने मंचेरियलकडे जाता येते. मात्र हा ६० किमीचा फेरा होतो. या मार्गे प्रवास केल्यास तिकीटापोटी प्रवाशांवर आर्थिक भूर्दंडही पडत असते. त्यामुळे बरेच नागरिक बसच्या मार्गाने न जाता सिरोंचाजवळील प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. तेलंगणाच्या सिमेवरील अर्जुनगट्टा गावातून तेलंगणाच्या बसने पुढे अनेक लोक जातात. सिरोंचा-चेन्नूर हे ३० किमीचे अंतर आहे. तसेच चेन्नूर ते मंचेरियल हे ३५ किमीचे अंतर आहे.सिरोंचा - चेन्नूरदरम्यान रापनपेल्ली, बक्कलचेलका, देवलाडा, रामपूर, पारपेल्ली, येरोपपेट्टा, चिंतलपल्ली आदी गावे पडतात. या सर्व गावातील रहिवासी नागरिक नावेचा प्रवास करून सिरोंचा मुख्यालयी पोहोचतात. प्राणहिता नदीवर धर्मपुरी गावाजवळ निर्माणाधिन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना नावेचा प्रवास पूर्णत: बंद होणार आहे.सध्या सिरोंचावरून मंचेरियलला बसने जायचे असल्यास सिरोंचा-कालेश्वर-महादेवपूर, काठाराम, मंचनी, गोदावरी, खनी येथून मंचेरियलला पोहोचता येते. मात्र या मार्गे ६० किलोमीटर अंतराचा अधिकचा फेरा मारावा लागतो. सदर मार्गे प्रवास केल्यास एकूण १२५ किमीचे अंतर गाठावे लागते. सिरोंचा नजीकच्या प्राणहिता नदीवरून अर्जूनगुट्टावरून बसने ६५ किमीचे अंतर गाठावे लागते. सदर अधिकचे अंतर कापणे आर्थिकदृष्ट्या या भागातील नागरिकांना परवडत नसल्याने सिरोंचा तालुक्यातील व सिरोंचा पलीकडचे तेलंगणा राज्यातील अनेक लोक नदीपात्रातून नावेने प्रवास करतात.