शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 22, 2015 01:28 IST

शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सायंकाळपर्यंत मेघगर्जनेसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला.

दीडशे गावांचा संपर्क तुटला : अहेरी-गडअहेरी, आलापल्ली-सिरोंचा मार्ग बंद, जिमलगट्टा-गोविंदगाव मार्गावरील पूल खचलागडचिरोली : शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सायंकाळपर्यंत मेघगर्जनेसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस असल्यामुळे अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील जवळपास दीडशे गावांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. पुरामुळे अहेरी-गडअहेरी, आलापल्ली-सिरोंचा तसेच आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाले आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून गोविंदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद आहे. जिल्ह्यात शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८५.२० सरासरीने एकूण १०२२.४ मिमी पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाने गडचिरोली तालुक्यात ८६.२, धानोरा २९.२, चामोर्शी १२२.०, मुलचेरा १३०.८, देसाईगंज ३६.०, आरमोरी २२.०, कुरखेडा २७.८, कोरची ४७.२, अहेरी १६१.२, एटापल्ली १८८.२ व सिरोंचा तालुक्यात १४१.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेतली आहे. संततधार पावसामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरुन पाणी ओसंडून वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. परिणामी इंदाराम, व्यंकटरावपेठा, आवलमरी, चेरपल्ली, बामणी, कोत्तागुड्डम आदींसह परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील रेपनपल्ली नाल्याला पूर आल्याने हा मार्गही बंद आहे. शिवाय आलापल्ली-भामरागड मार्गावरील छोट्या नाल्यांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आलापल्लीजवळील पुसुकपल्ली नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. भामरागड-लाहेरी मार्गही बंद आहे. या भागातील वीजपुरवठा व मोबाईलसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास अतिवृष्टीमुळे अहेरी येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील नामदेव कुळसंगे यांचे घर कोसळले. यावेळी ग्रा.पं. सदस्य शैलेश पटवर्धन यांनी कुळमेथे यांना मदत करुन त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. अहेरी नगर पंचायतीचे प्रशासक सुरेश पुप्पलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिमलगट्टा परिसरातील वीज पुरवठा व मोबाईलसेवाही पूर्णपणे बंद आहे.जिमलगट्टा ते गोविंदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे खचला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शनिवारपासून बंद आहे. पूर परिस्थितीमुळे जिमलगट्टा भागातील देचलीपेठा, किष्टापूर, दोडगेर आदीसह २० गावांचा संपर्क तुटला आहे. धानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्गांवर झाडे आडवी पडली असून, वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, अहेरी तालुक्यातील प्राणहिता व सिरोंचानजीकची पामुलगौतम नदी संततधार पावसामुळे दुथळी भरून वाहत आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे.एटापल्ली तालुक्यात गेदा परिसरात अनेक मार्गावर झाडे कोसळली. संततधार पावसामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील पेरणीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे गडचिरोली शहरातील कन्नमवारनगर, अयोध्या नगर, लांजेडा, बसस्थानक, तहसील कार्यालय, गांधी वार्ड , तसेच कॉम्प्लेक्स परिसरातील काही सखल भागात पाणी साचले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)