शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व सचिवावर कारवाईस दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:23 IST

तालुक्यातील मोहझरीचे सरपंच व सचिवांनी अनेक नियमबाह्य कामे करून आर्थिक गैरव्यवहार केला. मृत माणसाला जिवंत दाखवून त्यालाही रोखीने पैसे दिले असल्याची रोकडवहीत नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : सोनू साखरे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील मोहझरीचे सरपंच व सचिवांनी अनेक नियमबाह्य कामे करून आर्थिक गैरव्यवहार केला. मृत माणसाला जिवंत दाखवून त्यालाही रोखीने पैसे दिले असल्याची रोकडवहीत नोंद करण्यात आली. याबाबत चौकशी अहवालात आर्थिक अपहारास सरपंच व सचिवाला संयुक्तरित्या जबाबदार धरून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यासोबतच कार्यवाहीस पात्र ठरविण्यात आले. सरपंच व सचिवाकडून अपहाराची रक्कम तत्काळ वसूल करून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, असा चौकशी अहवालही जि. प. कडे तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला. परंतु दोघांनाही पाठीशी घालले जात आहे. अशा जि. प. च्या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनू साखरे यांनी गुरूवारी आरमोरी येथे पत्रकार परिषदेतून केली.मोहझरी ग्रामपंचायतीच्या विविध कामात मोठा गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार आपण आरमोरी पं. स. च्या बीडीओंकडे ५ जून २०१७ ला केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पं. स. विस्तार अधिकाºयांनी मोहझरी ग्रा. पं. मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर चौकशी अहवाल तयार करण्यात आला. संवर्ग विकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या संयुक्त सहीच्या चौकशी अहवालात सरपंच व सचिवाने नियबाह्य कामे करून अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. ग्रा. पं. च्या कामात जो अपहार झाला, त्याला सरपंच व सचिव हे दोघेही संयुक्तरित्या जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले. सरपंच मोहुर्ले यांच्याकडून १ लाख १० हजार ५७५ व सचिव मुळे यांच्याकडून १ लाख १३ हजार ४७७ रूपये वसुलीस व कायदेशिर कार्यवाहीस पात्र असल्याचे नमूद करण्यात आले.सदर अहवाल सीईओ व डेप्युटी सीईओ यांच्याकडे २३ जूनला पाठविला. परंतु अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नाही. या अहवालात सीताराम बोरूले या मृत व्यक्तीच्या नावाने रोखीने रक्कम दिल्याची रोकड वहीत नोंद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. सदर प्रकार गंभीर असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. आपल्याला मारण्याच्या धमक्याही येत आहेत. त्यामुळे सरपंच, सचिवावर कारवाई करावी, असे साखरे यांनी म्हटले.