शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभाग कारवाईत सुस्त

By admin | Updated: September 30, 2015 05:06 IST

१९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी पोलीस

गडचिरोली : १९९३ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही आहे. या विभागाचे गडचिरोलीत कार्यालय असून या कार्यालयात प्रभारी अधिकारी असल्याने दारूबंदी विरोधात कारवाईची प्रक्रिया पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरचा भार सातत्याने वाढत आहे.राज्यात गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारूचा व्यवसाय व अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. जवळजवळ या अवैध व्यवसायात १० हजारावर अधिक वृध्द पुरूष, महिला आदी गुंतलेले आहेत. अवैध दारूविक्री विरोधात लगाम कसण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात १ एप्रिल पासून पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा सुस्तावलेली आहे. गडचिरोली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात एकूण १८ पदे मंजूर आहेत. यामध्ये अधीक्षक, निरिक्षक, दुय्यम निरिक्षक, सहायक दुय्यम निरिक्षक, जवान, वाहन चालक, लेखापाल, लघुटंकलेखक, वरिष्ठ लिपीक, लिपीक, चपराशी असा बराच मोठा फौजफाटा आहे. मात्र या कार्यालयात २०१३ पासून अधीक्षक व निरिक्षकाचे पद रिक्त आहे. २०१५ च्या जूनपासून दुय्यम निरिक्षकाचे पदही रिक्त आहे. अवैध दारूविक्रीसंदर्भात धडक कारवाई करून गुन्हे नोंदविण्याची महत्त्वाची जबाबदारी या तिन्ही अधिकाऱ्यांवर आहे. मात्र हे तिन्ही अधिकारी प्रभारी आहेत. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर गडचिरोली येथील कार्यालय चालविले जात आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रीबाबत ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे दारूविक्रेत्यांविरोधात मागील एक-दीड वर्षांपासून कारवाया ठप्प झाल्या आहेत. या कार्यालयाकडे वाहन देण्यात आले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये या वाहनाला चंद्रपूर मार्गावर अपघात झाला. तेव्हापासून हे वाहन नादुरूस्त अवस्थेत पडून आहे. तर दुसरे वाहन निर्लेखित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीनंतर शासनाने केली होती. परंतु शासनाची उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा रिक्त पदांमुळे पांगळी असल्याने अंमलबजावणी कोसो दूर राहिली आहे. पोलीस प्रशासनाचे विशेष पथक कारवाया करण्यात गुंतले आहे. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय व मोहफुलाच्या दारू भट्ट्या गावागावात सुरू आहेत. अनेक पोलीस ठाण्यांचे हप्तेही दुपटीने वाढले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)वरोरा, दारव्ह्याचा भार असलेल्या अधिकाऱ्यांना दिला गडचिरोलीचा प्रभार४या कार्यालयाचा अधीक्षकांचा प्रभार चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे आहे. निरिक्षकाचा प्रभार चंद्रपूरच्या निरिक्षकाकडे सोपविण्यात आला आहे. तसेच दुय्यम निरिक्षकाचे मुख्यालय गडचिरोली आहे. मात्र त्यांचा कार्यभार अहेरी आहे. हे दुय्यम निरिक्षक सध्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील काम पाहत आहेत. प्रभारी अधिकारी असल्यामुळे गडचिरोलीचे हे कार्यालय कनिष्ठ कर्मचारीच चालवत आहेत.अधिकारी रूजू झालेच नाही ४राज्य शासनाने गडचिरोली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील अधीक्षक, निरिक्षक, दुय्यम निरिक्षक यांचे रिक्त असलेले तीन पद भरले होते. या पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र गडचिरोली जिल्ह्यात ते रूजू होण्यासाठी आलेच नाही. मात्र शासनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.