शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्याच्या पाण्यात बुडून डॉक्टरचा मृत्यू

By admin | Updated: April 16, 2017 20:47 IST

डॉ. आर. एल. जामी यांचा बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमतभामरागड (गडचिरोली), दि. 16 - नागालँड राज्यातील मूळचे रहिवासी असलेले व भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. आर. एल. जामी यांचा बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. डॉ. आर. एल. जामी हे २० मार्च २०१६ रोजी बंदपत्रित वैद्यकीय अधिकारी  म्हणून भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले होते. त्यांचा कंत्राट १९ मार्च २०१७ ला संपला होता. सेवेला मुदतवाढ मिळावी यासाठी त्यांनी आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्यांचा अर्ज विचाराधीन होता. या कालावधीत ते भामरागड येथील रुग्णालयात सेवा देत होते. १६ एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आले होते. भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील बिनागुंडा येथील राजीरप्पी धबधबा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सदर धबधबा पाहण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व  भामरागड येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी राजीरप्पा धबधबा पाहण्यासाठी गेले. धबधब्याच्या पाण्यात सर्वजण अंघोळ करीत असतानाच डॉ. आर. एल. जामी खोल पाण्यात गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पाण्यात बुडून मृत्यू असल्याची माहिती असली तरी, नेमका कसा मृत्यू झाला, हे अजूनही संशयास्पद आहे. याबाबतची तक्रार लाहेरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून लाहेरी पोलीस सखोल तपास करीत आहेत.वृत्त लिहीपर्यंत त्यांचा मृतदेह भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयात आणायचाच होता. सेवेला मुदतवाढ मिळण्याचा अर्ज विचाराधीन असतानाही ते भामरागड येथे अत्यंत चांगली सेवा देत होते. नागालँडचे असल्याने थोडीफार भाषेची समस्या निर्माण होत असली तरी आदिवासींच्या हावभावावरून त्यांचे आरोग्य समजून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. ग्रामीण रूग्णालयात मृतदेह आणला जाणार आहे, ही माहिती मिळताच रूग्णालयाच्या परिसरात सभोवतालच्या गावातील हजारो नागरिक गोळा होऊन होते. परराज्यातील डॉक्टर असले तरी मुख्यालयी राहून ते अविरत सेवा देत होते. ते अविवाहित होते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाने डॉ. जामी यांच्या  मृत्यूबाबतची माहिती आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या नागालँड येथील नातेवाईकांना कळविली आहे.