शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने मका पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:33 IST

रविवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रबी पिकांसह मका पिकाला बसला आहे.

ठळक मुद्देकुरखेडा तालुक्याला फटका : पंचनामे करून मदत देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतकुरखेडा : रविवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रबी पिकांसह मका पिकाला बसला आहे. मका पीक खाली पडल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कुरखेडा परिसरात रबी हंगामात यापूर्वी मिरची पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत होती. मात्र मिरची पिकातून फारसा नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून मका पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. पलसगड, पुराडा, मालेवाडा, कढोली परिसरात जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे. मका पिकाला फूल येण्यास सुरूवात झाली आहे. अशातच रविवारी सायंकाळी या परिसरात वादळवाºयासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळामुळे उभे असलेले मका पीक खाली कोसळले. तर काही मक्याची रोपटे मोडली आहेत. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे.मका पिकासह हरभरा, उडीद, मूग, लाखोळी, तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांनी सोमवारी गरगडा, खेडेगाव, पलसगड, चलनटोला, चारभट्टी, पिटेसूर, कोटलाडोह, अंतरगाव आदी गावांना भेटी देऊन रबी पिकांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे दिसून आले. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी प्रभाकर तुलावी व शेतकऱ्यांनी केली आहे.