शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो नदीत कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:12 IST

गडचिरोली शहराजवळच्या कठाणी नदी पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चालक ठार झाला तर इतर सात प्रवासी जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देकठाणी नदीत कोसळला : साखऱ्यातील सात प्रवासी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराजवळच्या कठाणी नदी पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चालक ठार झाला तर इतर सात प्रवासी जखमी झाले आहेत.डंबाजी कुरूडकर रा. काटली असे मृतक चालकाचे नाव आहे. या अपघातात साखरा येथील इंदिरा टेंभुर्णे (४०), गोविंदा मेश्राम (६५), भास्कर डोईजड (४५), प्रेमिला गायकवाड (४०), निशा उंदीरवाडे (४०), यमुनाबाई डोंगरवार सर्व रा. साखरा अशी जखमींची नावे आहेत. एमएच ३४ डी ५९१६ क्रमांकाचा आॅटो प्रवासी घेऊन आरमोरी मार्गाकडे गडचिरोलीकडे येत होत होता.दरम्यान नदीच्या पुलावर दुसरा एक ऑटो उभा असल्यामुळे साखऱ्याकडून येणाऱ्या ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो ऑटो नदीपात्रात कोसळला. यामध्ये चालकाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातकठाणी नदीवरील जुना पूल ठेंगणा तसेच अरूंद आहे. पावसाळ्यादरम्यान या पुलाच्या बाजूला गाळ साचला. त्यामुळे दोन वाहने समोर आल्यानंतर गाळाच्या मातीमुळे वाहन घसरत होते. वाहन घसरल्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून वाहन नदीपात्रात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. सदर गाळ उचलावा यासाठी लोकमतने अनेकवेळा वृत्त प्रकाशित करून बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते.