शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांपासून नालीतील गाळ उपशाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते.

ठळक मुद्देराजाराम येथील प्रकार : तुंबल्याने सांडपाणी वाहते रस्त्यावर; रोगराई पसरण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राजाराम येथील पोलीस कॉलनीमधील नाल्यांमधील गाळाचा उपसा गेल्या सहा ते सात वर्षांपासून न झाल्याने नाल्या गाळाने तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.राजाराम येथील पोलीस कॉलनीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळते. पावसाळा सुरू झाला असल्याने दुर्गंधीही वाढली. बहुतांश नाल्यांमध्ये प्लास्टिक बॉटल्स, कॅरिबॅग, काडीकचरा, दगड भरून आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळाचा उपसा करणे आवश्यक होते. परंतु याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केल्याने उपसा झाला नाही. केंद्र व राज्य शासनातर्फे दरवर्षी स्वच्छता व आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाते. यासाठी विशेष निधीही दिला जातो. अनेक ग्राम पंचायती वर्षभर स्वच्छता मोहीम राबवितात. परंतु राजाराम ग्रा. पं. याकडे दुर्लक्ष करीत आहे.ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशाराराजाराम ग्राम पंचायत अंतर्गत गावातील नाल्यांमधील गाळाचा उपसा दरवर्षी केला जात नाही. संपूर्ण गावातील गाळाचा उपसा तीन ते चार वर्षानंतर केला जातो. पोलीस कॉलनीतील गाळ उपसा सात वर्षापासून झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सचिव व प्रशासक गाळाचा उपसा करण्याकडे कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने दुर्गंधीमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे वारंवार सूचना देऊनही ग्राम पंचायतीला जाग आली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत नाल्यांमधील गाळाचा उपसा करून त्याची विल्हेवाट न लावल्यास ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा राजाराम वासीयांनी दिला आहे.राजाराम ग्राम पंचायतीने नाल्यांमधील गाळा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मार्च महिन्यापासून सरपंच पद रिक्त झाल्यानंतर पं. स. च्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. ग्राम सचिव व प्रशासक यांना गाळ उपसा करण्याबाबत सूचना दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गाळ उपशाचे काम सुरू होईल.- भास्कर तलांडे, सभापतीपं. स. अहेरी

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण