लोकमत न्यूज नेटवर्कघोट : गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली भाषिक बांधवांचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा मसुदा लवकरात लवकर तयार करून राज्य सरकारने याला मान्यता द्यावी, अशी मागणी भाजपच्या बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शहा यांनी आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांच्या नेतृत्त्वात ना. सुधीर मुनगंटीवार व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांची मुंबई येथे भेट घेऊन बंगाली बांधवांच्या समस्या मांडल्या. दिलेल्या निवेदनात शहा यांनी म्हटले आहे की, सर्वेक्षणाचा मसुदा तयार करून राज्य सरकारने याला मान्यता देऊन तो केंद्र सरकारकडे पाठवावा. जेणेकडून बंगाली भाषिकांना आर्थिक व शैक्षणिक आरक्षण मिळू शकते.
बंगाली सर्वेक्षणाचा मसुदा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:43 IST
गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली भाषिक बांधवांचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा मसुदा लवकरात लवकर तयार करून राज्य सरकारने याला मान्यता द्यावी, अशी मागणी भाजपच्या बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बंगाली सर्वेक्षणाचा मसुदा तयार करा
ठळक मुद्देवित्त व वनमंत्र्यांना निवेदन : आमदारांच्या नेतृत्वात शहांची मागणी