शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

वसतिगृहातील भोजनाची तपासणी होणार

By admin | Updated: November 25, 2014 22:54 IST

आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याची ओरड नेहमी विद्यार्थी

दर्जा सुधारणार : प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढली नवी क्लृप्तीदिलीप दहेलकर - गडचिरोलीआदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याची ओरड नेहमी विद्यार्थी व पालकांकडून होत असते. निकृष्ट भोजन मिळत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांना प्राप्त झाल्या. या संदर्भात त्यांनी नवा निर्णय घेऊन वसतिगृहातील भोजनाची तपासणी करण्याबाबत जिल्हा आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाला पत्र दिले आहेत. नव्या निर्णयानुसार आता गडचिरोली प्रकल्पातील २१ शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील भोजनाची महिन्यातून दोनदा तपासणी करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत २१ शासकीय आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह सुरू आहेत. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना कंत्राटदारांमार्फत भोजन पुरवठा केला जातो. प्रकल्प कार्यालयाच्यावतीने ई-निविदा प्रक्रिया राबवून भोजन पुरवठ्याचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र संबंधीत कंत्राटदार काही दिवस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ठ भोजनाचा पुरवठा करतात. तर काही दिवस दर्जेदार भोजन देतात. कंत्राटदारांकडून निकृष्ट भोजन मिळत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांना प्राप्त झाल्या. या तक्रारीची दखल घेऊन प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी प्रकल्पातील सर्व शासकीय मुलामुलींच्या वसतिगृहातील भोजनाची वसतिगृहाच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करावी, असा निर्णय घेतला. याबाबत प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात पत्र पाठविले आहे. पोषक अन्नाचा निकटचा संबंध विद्यार्थ्यांचे आरोग्य व बौध्दिक क्षमतेशी आहे. त्यामुळे शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना नियमित दर्जेदार व पोषक भोजन मिळावे, याकरीता प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी नवे पाऊल उचलले आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या या नव्या निर्णयामुळे आता प्रकल्पातील २१ वसतिगृहातील भोजनाची नियमित तपासणी होणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यांपासून सुरू होणार आहे. वसतिगृहातील भोजनाच्या तपासणीच्या कामात संबंधीत वैद्यकीय अधिकारी व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हयगय केल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही प्रकल्प अधिकाऱ्यांनी आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या निर्णयामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.