शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘डोन्ट वरी...’ कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात 1078 बेड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

सध्या जिल्हाभरात ५१० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पण त्यातील ३०१ रुग्णच विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित २०९ जण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाची लक्षणेविरहित रुग्णांना स्वत:च्या घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने उपचारासाठी तयार केलेले अनेक बेड अजूनही रिकामेच आहेत.

ठळक मुद्देकेवळ ३०७ रुग्ण भरती : रुग्णसंख्या पुन्हा घटण्याच्या मार्गावर

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आणि चर्चा सुरू असली तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता घटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. तरीही आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या विविध उपचार केंद्रांमध्ये १३८५ बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ३०७ बेडवर रुग्ण असून १०७८ बेड अजूनही शिल्लक आहेत.देशाच्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले जाते. अनलॉक प्रक्रियेत अनेक व्यवहार आणि आता शाळाही सुरू झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढेल की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गेल्या पाच दिवसात कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होणे ही बाब जिल्हावासियांना दिलासा देणारी आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढलेच तर त्यासाठी ठिकठिकाणची रुग्णालयेही सज्ज आहेत. सध्या जिल्हाभरात ५१० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पण त्यातील ३०१ रुग्णच विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित २०९ जण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाची लक्षणेविरहित रुग्णांना स्वत:च्या घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने उपचारासाठी तयार केलेले अनेक बेड अजूनही रिकामेच आहेत.विशेष म्हणजे कोविड रुग्णांवर उपचारासाठी तयार केलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये आदिवासी विभागाच्या वसतिगृहांचा समावेश आहे. पण येत्या १ जानेवारीपासून आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून तसे झाल्यास आरोग्य विभागाला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड किंवा व्हेंटीलेटर्सची कमतरता नाही. क्रियाशिल कोरोना रुग्णांची संख्या ९९० पर्यंत गेली तरीही बेड शिल्लक होते. आता तर ही संख्या ५१० वर आली आहे. त्यातच आता रुग्णांसाठी होम आयसोलेशनची सुविधा असल्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.- डॉ.विनोद म्हशाखेत्रीसाथरोग अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या