शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांना मदत करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:16 IST

नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.

ठळक मुद्देएसडीपीओंचे आवाहन : भामरागडात पोलीस विभागातर्फे जनमैत्री मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.नक्षल सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने भामरागड येथे मंगळवारी जनमैत्री मेळावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कैलास अंडिल, नायब तहसीलदार निखील सोनवने, भामरागडच्या नगराध्यक्ष संगीता गाडगे, नगरसेविका शारदा कंबगोनीवार, भामरागड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भांड, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवने तसेच सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी तहसीलदार अंडिल म्हणाले, शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागात आरोग्यसेवा, शिक्षण व इतर सेवा पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी आपल्या समस्या प्रशासनापुढे मांडाव्या तसेच रस्ता व इतर विकास कामांसाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे सांगितले.यावेळी कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांची तसेच आदिवासी बांधवांची भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक संदीप भांड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल, होनमने, सूरज सुसतकर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान पुरामध्ये अडकलेल्या लोकांसाठी पोलीस विभागाच्या वतीने कार्यक्रमस्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी