शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे असहकार आंदोलन

By admin | Updated: May 29, 2014 02:15 IST

प्रलंबित मागण्या सोडवाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट-अ तर्फे बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टरांनी काळ्या फीत लावून काम केले.

गडचिरोली : प्रलंबित मागण्या सोडवाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट-अ तर्फे बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टरांनी काळ्या फीत लावून काम केले. त्यामुळे वैद्यकीय सेवा प्रभावीत झाली नाही. मात्र मागण्या मान्य न झाल्यास २ जूनपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

२00९-१0 मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्ष लाभ देण्यात यावा, ७७९ बीएएमएस व ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवा समावेशन करण्यात यावे, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतन देण्यात यावे, एमबीबीएस, बीएएमएस पदव्यूत्तर वैद्यकीय अधिकार्‍यांचा खाते अंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रिक वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटनेतर्फे असहकार आंदोलन सुरू केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समस्यांकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे डॉक्टर शासकीय सेवा करण्यास तयार होत नाही. याचा परिणाम गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर काळ्या फीती लावून दिवसभर रूग्णसेवा केली. त्यामुळे रूग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. शांततेने चालणार्‍या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास २ जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी मॅग्मो संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर, सचिव डॉ. सुनिल मडावी, कार्याध्यक्ष डॉ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. आखाडे, डॉ. देवरी, डॉ. तारडे, डॉ. करेवार, डॉ. ताराम, डॉ. म्हस्के, डॉ. धुर्वे, डॉ. कारेकर आदी उपस्थित होते.

(नगर प्रतिनिधी)