हिवतापाची पसरली होती साथ : घरोघरी जाऊन केले उपचारचामोर्शी : तालुक्यातील विकासपल्ली येथे मलेरियासह हिवतापाची साथ पसरली होती. या घटनेचे सर्वात प्रथम वृत्त २७ नोव्हेंबरच्या लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ या वृत्ताची दखल घेत आरोग्य यंत्रणा कामाला लागली. १ डिसेंबर रोजी विकासपल्ली येथे आरोग्य यंत्रणेने शिबिर लावून रूग्णांची तपासणी केली. घरोघरी जाऊन रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केलेत. विकासपल्ली येथे आरोग्यविषयक व किटक आजाराबाबत माहिती जनतेला सांगण्यात आली. घराच्या व परिसरातील डासोत्पत्ती स्थाने शोधून काढले व आढळलेले डास अळी नष्ट करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर सर्व्हेक्षण व आरोग्य तपासणी कामासाठी डॉ. बी. के. देवरी, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आय. जी. नागदेवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. एस. ताराम, जिल्हा किटक आजार सल्लागार राजेश कार्लेकर, आरोग्य सहाय्यक पी. व्ही. दोडके, वितराज कुनघाडकर यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू गावात दाखल होऊन नागरिकांना मार्गदर्शन केले. या कामासाठी राधेक्रिष्ण मंदिर सभासदांनी सहकार्य केले. या भागात साथरोग आटोक्यात आल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
विकासपल्लीत दाखल झाले डॉक्टर
By admin | Updated: December 3, 2014 22:50 IST