शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भीतीने नक्षल्यांना शरण जाऊ नका

By admin | Updated: August 3, 2016 02:12 IST

शिक्षण व विकासकामात अडथळे निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना सहकार्य करू नका. शिक्षित समाज विकासाच्या दिशेने

अभिजित फस्के यांचे आवाहन : कुरखेडात शांतता मेळाव्याचा समारोप; शहरात काढली रॅली कुरखेडा : शिक्षण व विकासकामात अडथळे निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना सहकार्य करू नका. शिक्षित समाज विकासाच्या दिशेने अधिक सक्षमपणे अग्रेसर होत असतो. शिक्षणच तुमच्या विकासाची पायरी ठरू शकते. सुशिक्षित कधीच नतमस्तक होत नाही, त्यामुळे नक्षल्यांच्या भीतीपुढे शरण जाऊन भावीपिढीचे आयुष्य अंधकारमय करू नका, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांनी केले. कुरखेडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात पोलीस विभागाच्या वतीने आयोजित चार दिवसीय निवासी शांतता मेळावा प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना फस्के बोलत होते. चार दिवसीय शिबिरात स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, जनावरांचे आजार, संगोपन, आपत्ती व्यवस्थापन, पेसा कायदा, पथनाट्य, चित्रपट योगा, क्रीडा, सांस्कृतिक माहिती, गावठी व अनैसर्गिक उपचार पद्धती, आधुनिक शेती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तहसीलदार गुंफावार, संवर्ग विकास अधिकारी तुरकर, ठाणेदार विलास सुपे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे, वनकर, विलास घिसाडी उपस्थित होते. कार्यक्रमाला दुर्गम भागातील २२५ नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांना पँट, टीशर्ट व भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच त्यांच्या हातावर शांततेचे प्रतीक असलेला सफेद धागा बांधण्यात आला. संचालन पीएसआय गिरी तर आभार पीएसआय कटारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस हवालदार नरेंद्र बांबोळे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कुरखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी सकाळी ९ वाजता शहरात शांतता रॅली काढण्यात आली. मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील अनेक वॉर्डांतून रॅली फिरवून जनजागृती करण्यात आली. यावेळी ठाणेदास विलास सुपे, पीएसआय कटारे, वनकर, विलास घिसाडी, शुक्ला यांच्यासह कर्मचारी व शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई हायस्कूल, श्रीराम विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)