शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे हक्क व अधिकार हिरावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:01 IST

बालकांचे हक्क व अधिकार कोणीही हिरावू नये, शिवाय बालकांचे संरक्षण झाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रशासन व शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांनी केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे आवाहन : १९ जुलैच्या सुनावणीबाबत नियोजन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बालकांचे हक्क व अधिकार कोणीही हिरावू नये, शिवाय बालकांचे संरक्षण झाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रशासन व शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांनी केले.१९ जुलै रोजी राष्ट्रीय बालहक्क आयोगाची सुनावणी गडचिरोली येथे होणार आहे. या जनसुनावणीच्या अनुषंगाने विविध तक्रारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व नियोजन बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला जिल्हा महिला, बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड आदीसह इतर अधिकारी उपस्थित होते.नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील बालहक्क व संरक्षणविषयक तक्रारींची सुनावणी १९ जुलै रोजी गडचिरोली घेतली जाणार आहे. या सुनावणीबाबतचा संदेश लोकांपर्यंत पोहोचू द्या, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी जिल्ह्यातील विभागप्रमुखांना यावेळी केल्या.शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक व इतर विभाग प्रमुखांना बालहक्क सुनावणीबाबत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावात दवंडी देणे, रॅली काढणे, बैठका आयोजित करून तक्रारी दाखल करण्याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांनी दिल्या. यावेळी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा- भडांगेसदर सुनावणीच्या प्रक्रियेत सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. संस्थांमार्फत विविध समस्या यावेळी मांडता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले. यावेळी सामाजिक संस्थांच्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी पालकांना विद्यार्थ्यांमार्फत पत्र देणे, पालकांशी संवाद आदी उपक्रम राबवावे, अशा सूचना दिल्या. तक्रारी येण्यासाठी लोकांपर्यंत माहिती पोहोचणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.