शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
2
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
3
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
4
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय
5
महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना
6
जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग
7
फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे
8
सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला
9
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात दिसला; भारतविरोधी रॅलीत हाफिज सईदच्या मुलाचीही उपस्थिती
10
तपासणीदरम्यान कारमध्ये सापडलं घबाड, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, आता इन्कम टॅक्स विभागाकडून तपास सुरू   
11
डॉलरचं स्वप्न, हिमवादळाचा तडाखा अन् मृत्यू; मानवी तस्करांच्या जाळ्यात 'असं' अडकलं भारतीय कुटुंब
12
"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
13
"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद
14
क्रेडिट कार्डचे नियम, एलपीजी सिलेंडरच्या...; १ जूनपासून हे ५ मोठे बदल होणार; तुमच्या खिशावर परिणाम होणार
15
Astro Tips: शुक्रवारी 'या' कुबेर मंत्राचा जप करा, दु:ख, दरीद्र्याला घरातून कायमचे घालवा!
16
पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच
17
शशांक, लता, करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सासू, नणंदेचा लगेचच जामिनासाठी अर्ज
18
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा नकार ऐकून बॉयफ्रेंडने कहरच केला, घरावर ग्रेनेड फेकला अन्... 
19
कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त
20
 ५२ लाख रुपये मिळवण्याची हाव, पतीने मित्रांसोबत मिळून आखला भयानक कट, त्यानंतर...

बाबासाहेबांना दलितांपुरते मर्यादित ठेवू नका

By admin | Updated: January 30, 2016 01:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, आदिवासी व अन्य पीडित घटकांसाठी मोठे काम केले.

गडचिरोलीत कार्यक्रम : विरा साथीदार यांचे आवाहनगडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, आदिवासी व अन्य पीडित घटकांसाठी मोठे काम केले. संविधान सभेला त्यांनी दिलेल्या निवेदनातून त्याची प्रचिती येते. मात्र बाबासाहेबांना दलितांपुरते मर्यादित ठेवण्याचे काम आपणच केले. हा प्रकार यापुढे थांबायला हवा, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते विरा साथीदार यांनी शुक्रवारी येथे केले.सम्यक विद्यार्थी आंदोलन, बहुजन विचार मंच, एआयएसएफ व अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व जातिअंताचा संघर्ष’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवी अशोक गडकरी होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर येथील पत्रकार मिलिंद कीर्ती यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना विरा साथीदार म्हणाले, उद्योगांचे राष्ट्रीयकरण, प्रत्येक माणसाचा विमा, सक्तीचे व मोफत शिक्षण या बाबींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आग्रह धरला. त्यामागे पीडित समाजाला न्याय देण्याची भूमिका होती. यासंदर्भात बाबासाहेबांनी सविधान सभेला निवेदन दिले. परंतु प्रत्यक्षात संविधान निर्मितीमध्ये अनेक बाबींचा त्यांना समावेश करता आला नाही, असेही विरा साथीदार यांनी स्पष्ट केले.अशोक गडकरी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, बाबासाहेबांचे विचार व कार्य मोठे होते. वंचित घटकांना दिशा देण्याचे त्यांनी आयुष्यभर कार्य केले. बाबासाहेबांच्या विचारांचा व्यापक प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी, डॉ.कैलाश नगराळे, प्रा.डॉ.दिलीप बारसागडे, अ‍ॅड.जगदीश मेश्राम, संदीप रहाटे, रामदास जराते,अम्ब्रिश उराडे,ओमप्रकाश टेंभूर्णे, बाळकृष्ण बाभुलकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन महेश राऊत यांनी केले. याप्रसंगी माला भजगवळी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य व विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदीप राहाटे, जगन जांभुळकर, यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)