शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांकडे दुर्लक्ष करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:35 IST

प्रभाग क्रमांक ४ रामनगर परिसरात रिकाम्या भूखंडावर डुकर व पाळीव जनावरांचा हैैदोस राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील रस्ते उखडलेले असल्याने पावसाळ्यात चिखल साचते. या समस्या मार्गी लावण्याबाबत आपण यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना निवेदन दिले होते.

ठळक मुद्देकार्यवाही करा : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकाचे स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रभाग क्रमांक ४ रामनगर परिसरात रिकाम्या भूखंडावर डुकर व पाळीव जनावरांचा हैैदोस राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील रस्ते उखडलेले असल्याने पावसाळ्यात चिखल साचते. या समस्या मार्गी लावण्याबाबत आपण यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र दुर्लक्षितपणामुळे या समस्या मार्गी लावण्यात आल्या नाही. त्यामुळे आता आपण पुन्हा समस्यांसंदर्भात स्मरणपत्र देत असून या समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक गुलाब मडावी यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी २५ जूनला नगराध्यक्ष योगिता पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांना विविध समस्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, अटी व शर्तीनुसार १५ दिवसातून एकदा रामनगरातील नाल्यांचा उपसा होणे आवश्यक आहे. मात्र याकडे संबंधित कंत्राटदार व नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रामनगरातील बहुतांश नाल्या गाळाने तुंबल्या असल्याने दुर्गंधी पसरत आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून नाल्यांमध्ये फवारणी करावी, कचऱ्याचे ढिगारे इतरत्र हलवावे, अशी मागणी मडावी यांनी केली आहे.रामनगरात दररोज नियमितपणे सकाळच्या वेळेत घंटागाडी येत नाही. ही समस्या मार्गी लावावी, रस्ते उखडल्यामुळे पावसाळ्यात चिखल निर्माण होत असते. त्यामुळे रस्त्यांची दुरूस्ती करावी, नवीन विद्युत खांब लावून पथदिव्यांची व्यवस्था करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष