शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धनगरांना एसटीत सामावू नका

By admin | Updated: July 31, 2014 00:02 IST

भारतीय राज्यघटनेच्या स्विकृतीनंतर ६४ वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याच्या

राज्यपालांना निवेदन पाठविले : आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनची मागणीअहेरी : भारतीय राज्यघटनेच्या स्विकृतीनंतर ६४ वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याच्या शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. मात्र यामुळे अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्यावतीने अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, विशिष्ट भूप्रदेश, विशिष्ट बोलीभाषा, प्रथा, परंपरा, निसर्गावर आधारित जीवनपध्दती असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या समाजाला शासनाने आरक्षण दिले आहे. एकूण ४७ जमातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश होतो. या जमातीतील लोकांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने अनुसूचित जमाती प्रवर्गाला राज्य घटनेने आरक्षण दिले आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जमातीतील लोकांचा विरोध नाही. मात्र त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. शासकीय सेवेतील वर्ग १ व वर्ग २ ची पदे भरताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आरक्षणाचा विचार करून प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी फेडरेशनच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मागण्यांचे निवेदन अहेरीचे नायब तहसीलदार सिलमवार यांना देण्यात आली. यावेळी एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रमेश हलामी, अहेरी तालुकाध्यक्ष रघुनाथ तलांडे, कुणाल कोवे, मधुकर सडमेक, मारोती आत्राम, नारायण कुसराम, नरेंद्र कोकुडे, विजय गेडाम, बाबुराव तोरे, विलास सिडाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)