शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

ग्रामसेवकांची मानहानी करू नका

By admin | Updated: February 13, 2015 01:44 IST

विभागीय चौकशी न करता तसेच विभागीय प्रमुखांकडून तक्रार नसतानाही सामान्य नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत.

सिरोंचा : विभागीय चौकशी न करता तसेच विभागीय प्रमुखांकडून तक्रार नसतानाही सामान्य नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे ग्रामसेवकांची मानहानी होत आहे. गावातील विकास कामे कशी करायची, असा प्रश्न ग्रामसेवकांच्या पुढे निर्माण झाला असल्याने ग्रामसेवकांच्या विरोधात विनाकारण होणारी कार्यवाही थांबवून ग्रामसेवकांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे साकडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना तालुका शाखा सिरोंचाच्या शिष्टमंडळाने सिरोंचाच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे घातले आहे. ग्रामसेवक संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस, अधिकारी व कर्मचारी कुठल्याही प्रकारच्या चौकशीला न बोलाविता तसेच सूचनापत्र न देता अट्टल गुन्हेगाराप्रमाणे वाहनात बसवून ग्रामसेवकांना पोलीस ठाण्याच आवारात ठेवण्याचा प्रकार होत आहे. सिरोंचा तालुका नक्षलप्रभावीत असतानाही ग्रामसेवकांना चौकशीसाठी रात्रीच्या वेळेस ग्रामपंचायतस्थळी नेण्यात येत आहे. अशा वाईट अनुभवाला ग्रामसेवकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांचे मनोबल खचले आहे. असेही संघटनेने म्हटले आहे. निवेदन देताना जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, सिरोंचा तालुकाध्यक्ष मंगेश वाळके, मंगरू मोगरकर, डी. ए. वायभसे, जी. डी. मडावी, आर. एम. बोरकुटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)