शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जिल्हाभर वृक्ष लागवड मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:24 IST

महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीमेस शुभारंभ झाला असून सोमवारी व मंगळवारी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. सदर उपक्रमात शाळा, महाविद्यालयासह विविध शासकीय विभाग, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या वतीने योगदान देण्यात आले.

ठळक मुद्देविविध उपक्रम : लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीमेस शुभारंभ झाला असून सोमवारी व मंगळवारी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. सदर उपक्रमात शाळा, महाविद्यालयासह विविध शासकीय विभाग, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या वतीने योगदान देण्यात आले.श्री साई स्कूल आॅफ नर्सिंग आरमोरीश्री साई स्कूल आॅफ नर्सिंग आरमोरी येथे १ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर साळवे, प्राचार्य नेहा ओळख आदी उपस्थित होते. संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. संचालन प्रीती उईके तर आभार नेहा खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी भूषण ठाकर, मेश्राम, केशव सेलोटे, वासुदेव फुलबांधे, पिंकी साळवे यांच्यासह एएनएम प्रथम व द्वितीय सत्राच्या विद्यार्थिनींनी सहकार्य केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्षांचे असलेले महत्त्व पटवून दिले. प्रत्येक विद्यार्थ्याने झाडे लावली. जेवढी झाडे लावण्यात आली. तेवढ्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांवर सोपविण्यात आली. त्यामुळे लावलेली झाडे जगतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सुभाषनगर येथे वृक्षारोपणचामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषी स्पंदन संघाच्या वतीने सुभाषनगर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करून कृषी दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक मडावी, कृषी सहायक प्रवीण पाटील, उपसरपंच देवराव नैैताम, कृषीमित्र उमेश भांडेकर, प्रियंका वासनिक, पल्लवी वन्नेवार, प्रिया वाकुडकर, वैैष्णवी झाडे आदी उपस्थित होते.मासाहेब आश्रमशाळा, कोटराकोरची तालुक्यातील कोटरा येथील अनुदानित मासाहेब माध्यमिक आश्रमशाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी क्षेत्र सहायक के. जे. उमरे, वनरक्षक एल. आर. चौधरी, माध्यमिक मुख्याध्यापक सुनील अवसरे, प्राथमिक मुख्याध्यापक यशवंत दरवडे, अरविंद काशिवार, सुधाकर कामडी, नमो मेश्राम, रमेश शहारे, रमेश नान्हे, राकेश कुळसंगे, घनश्याम वनवे, सुशील म्हस्के, नितीन पित्तुरवार, वसंत बुरे, संदीप चौरे उपस्थित होते.कारसपल्लीत वृक्षारोपणसिरोंचा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या कारसपल्ली येथील रोपवनात पाच हजार वृक्ष लावण्यात आले. उपवनसंरक्षक सुनील कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवाद, सुनील खरात, नायब तहसीलदार एच. एस. सय्यद, वन परिक्षेत्राधिकारी वि. वा. नरखेडकर, वनपाल एल. एम. शेख, वनरक्षक शेख, रवी रालबंडीवार, मधुकर कोल्लुरी यांच्यासह जि. प. शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, वन कर्मचारी, मेडाराम, कारसपल्ली, नारायणपूर येथील नागरिक उपस्थित होते.जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरायेथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. किरमिरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय मुरकुटे, प्रा. डॉ. गणेश चुधरी, प्रा. डॉ. पंढरी वाघ, डॉ. लांजेवार, डॉ. डी. बी. झाडे, डॉ. ढाकळे, प्रा. खोब्रागडे, प्रा. करमणकर, प्रा. रणदिवे, प्रा. आवारी, प्रा. ज्ञानेश बनसोड, प्रा. डॉ. दुपारे आदी उपस्थित होते. यावेळी आवळा, काजू, सीताफळ, फणस आदी झाडे लावण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सूर्यारावपल्लीशाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कैैवल्य एज्युकेशन फाऊंडेशनचे संयोजक अभय प्रतापसिंह यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला केंद्रप्रमुख एल. आर. चेडे, मुख्याध्यापक के. जी. गागारपूवार, सहशिक्षक तन्नीर आदी उपस्थित होते.महिला महाविद्यालय, गडचिरोलीगडचिरोली येथील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ३ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हंसा तोमर, डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, डॉ. नंदा सातपुते यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होेते. यावेळी एकूण ८० झाडे लावण्यात आली. लावलेली झाडे जगविण्याचा संकल्प उपस्थित विद्यार्थ्यांनी केला.