शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.मध्ये २५ कोटींच्या कामांचे नियोजन नियमबाह्य

By admin | Updated: January 1, 2016 02:23 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने केलेले २५ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन नियमबाह्य असून अनेक जिल्हा

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने केलेले २५ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन नियमबाह्य असून अनेक जिल्हा परिषद सदस्यांवर काम वाटपात अन्याय झाला असल्याचा आरोप करुन कामाचे फेरनियोजन करण्यासाठी जि.प.ची विशेष सभा घेण्यात यावी व या सभेमध्ये कामाचे नियोजन करावे, अशी मागणी ज्येष्ठ जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, यशवंत धुळसे, होमराज आलाम, पूनम गुरनुले, लैजा चालूरकर, ग्यानकुमारी कौशी, कविता सिडाम यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी केली आहे. पत्रकार परिषदेत जगन्नाथ बोरकुटे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या विकास निधीपैकी ६० टक्के निधी नक्षलग्रस्त भागासाठी, तर ४० टक्के निधी उर्वरित क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. कामांचे नियोजन करताना संबंधित क्षेत्रात कामाची निकड व त्या क्षेत्राच्या जि.प.सदस्याचे मत लक्षात घेतले जात नाही. अलिकडेच ‘३०-५४’ व ‘१३-वने’ शिर्षकांतर्गत २५ कोटींच्या कामांचे नियोजन केले. परंतु बहुतांश जि.प. सदस्यांच्या क्षेत्रांना विकासकामातून वगळण्यात आले, असा आरोप बोरकुटे यांनी केला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून बांधकाम समितीने कामांची यादी स्थायी समितीपुढे ठेवली नाही. सध्याच्या नियोजनात कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे कामे दिली आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी किमान २५ ते ३० लाखांचा निधी हवा, अशी मागणीही त्यांनी केली. २५ कोटींच्या कामांसाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी करणारे पत्र १९ सदस्यांच्या स्वाक्षरीने जि.प. अध्यक्षांना दिले आहे. नियमानुसार सात दिवसांच्या आत विशेष सभा बोलवावी लागते. मात्र अद्याप अशी सभा बोलविली नाही. विशेष सभा आयोजित केली नाही, तर १९ सदस्य उपोषणाला बसतील, असा इशाराही बोरकुटे यांनी दिला. (नगर प्रतिनिधी)कामाचे नियोजन नियमबाह्य नाही- गण्यारपवारगडचिरोली जिल्ह्यात पाच तालुक्यांसाठी ५१ टक्के निधीचे नियोजन ठेवावे लागते. या तालुक्यातून १५ जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर उर्वरित सात तालुक्यांसाठी ४९ टक्के निधीचे नियोजन ठेवावे लागते. या तालुक्यातून ३५ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने ४९, ५१ व २२ या फार्म्युल्याच्या आधारे कामाचे नियोजन केलेले आहे. २७ एप्रिल २००२ च्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाच्या शासन निर्णयानुसार जि. प. व पं. स. सदस्यनिहाय कामाचे वाटप करण्यात येऊ नये असे सूचविण्यात आले आहे. संबंधित नियोजन हे यापूर्वीच करण्यात आले आहे. ज्या १९ सदस्यांनी विशेष सभा बोलाविण्याचे पत्र जि.प. प्रशासनाला दिले आहे. या पत्रावर किमान सात सदस्यांच्या सह्या या बोगस (नातलगांनी स्वत: केलेल्या) आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी लोकमतला दिली.