शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खासगी मोबाईल कंपन्यांकडून जिल्हा वाळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:16 IST

शहरात मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात खासगी कंपन्यांमध्ये फार मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक मोठ्या गावात टॉवर उभारले जात आहेत. मात्र या खासगी कंपन्यांनी गडचिरोली जिल्ह्याला वाळीत टाकले आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, अहेरी यासारखे तालुकास्थळ सोडले तर ग्रामीण व दुर्गम भागात खासगी कंपन्यांचे नगण्य टॉवर आहेत.

ठळक मुद्देदुर्गम भागात टॉवरच नाही : बीएसएनएलच्या सेवेवर बहुतांश भागातील दूरसंचार सेवेचा भार

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरात मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात खासगी कंपन्यांमध्ये फार मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक मोठ्या गावात टॉवर उभारले जात आहेत. मात्र या खासगी कंपन्यांनी गडचिरोली जिल्ह्याला वाळीत टाकले आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, अहेरी यासारखे तालुकास्थळ सोडले तर ग्रामीण व दुर्गम भागात खासगी कंपन्यांचे नगण्य टॉवर आहेत. भामरागड, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, कोरची या तालुक्यांमध्ये तर खासगी कंपन्यांचे एकही टॉवर नाही. या तालुक्यांमध्ये केवळ बीएसएनएल सेवा पुरवत आहे.मोबाईल व इंटरनेटचे महत्त्व वाढत चालले असल्याने देशातील प्रत्येक गाव मोबाईल क व्हरेज व इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचे धोरण केंद्र शासनाने सुरू केले आहे. मोबाईलची वाढलेली बाजारपेठ लक्षात घेऊन खासगी कंपन्या सुद्धा ग्रामीण भागात जाऊन मोबाईल सेवा उपलब्ध करून देत आहेत. प्रत्येक मोठ्या गावी टॉवर उभारले जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना भुरळ पाडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गळाकापू स्पर्धेत काही कंपन्यांना ताले सुध्दा ठोकावे लागले आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय भिन्न आहे. या जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे ते मोबाईलवर जास्त खर्च करू शकत नाही, असा चुकीचा अंदाज या कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून काढला जात आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल टॉवर उभारून सेवा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी या तालुक्यांमध्ये थोडाफार उत्पन्न मिळू शकते. ही बाब लक्षात आल्यानंतर खासगी कंपन्यांनी तालुकास्थळी व ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांमध्ये टॉवर उभारले आहे. मात्र कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमध्ये खासगी कंपनीचा एकही टॉवर नाही. त्यामुळे येथील ग्राहकांना बीएसएनएलच्या सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे.बीएसएनएल सुध्दा अतिशय खराब सेवा पुरवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र बीएसएनएलशिवाय पर्याय नसल्याने बीएसएनएलची मक्तेदारी झाली आहे. बऱ्याचवेळा कव्हरेज राहत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बीएसएनएलच्या टॉवरवर थ्रीजी यंत्रणा बसविली असल्याचे बीएसएनएलचे अधिकारी सांगत असले तरी टू-जीची सेवा सुध्दा उपलब्ध होत नसल्याची ओरड ग्राहकांकडून नेहमीच ऐकायला मिळत आहे. बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा होणे आवश्यक आहे.सीएसआर निधीतून सेवा सक्तीची करावीप्रत्येक खासगी कंपनीला होणाऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या काही खर्च सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) खर्च करावा लागतो. गडचिरोली जिल्हा दूरसंचार सेवेबाबत उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून मोबाईल कंपन्यांना या जिल्ह्यात सीएसआर मोबाईल टॉवर उभारून सेवा देणे सक्तीचे करावे, असे झाल्यास मोबाईल कंपन्या आपोआप टॉवर उभे करतील. टॉवर न लावण्यासाठी नक्षलवादाची समस्या सांगितली जाते. मात्र गडचिरोली चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रभाव नाही. किमान अशा ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यास खासगी कंपन्यांना सक्ती करावी, अशी मागणी आहे.५२५ गावे कव्हरेजच्या बाहेरगडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६७९ गावे आहेत. बीएसएनएलने केलेल्या सर्वेक्षणात केवळ १ हजार १५४ गावांमध्ये मोबाईलचे कव्हरेज असल्याचे दिसून आले आहे. सुमारे ५२५ गावांमध्ये कव्हरेज नाही. नक्षलच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने लेफ्टविंग योजनेंतर्गत टॉवर बांधकामासाठी मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील काही टॉवरचे काम पूर्ण झाले आहे तर काही प्रगतीपथावर आहेत. तरीही जिल्ह्याच्या एकूण भूभागाच्या सुमारे ३१ टक्के भाग कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. संपूर्ण जिल्ह्यात बीएसएनएलचे केवळ १३१ मोबाईल टॉवर आहेत. जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत टॉवरची संख्या अतिशय कमी आहे. त्यातही जंगल भाग असल्याने मोबाईल टॉवर जास्त दूर अंतरावर रेंज पुरवू शकत नाही.

टॅग्स :Mobileमोबाइल