शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची आरोग्यसेवा बळकट करणार

By admin | Updated: July 18, 2016 02:07 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीपासून येथील आरोग्य सेवा दुर्लक्षित आहे. येथील रूग्ण व जनता आवश्यक आरोग्य सुविधेपासून अद्यापही वंचित आहे.

पालकमंत्र्यांचे आश्वासन : अहेरीत आरोग्य शिबीर अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीपासून येथील आरोग्य सेवा दुर्लक्षित आहे. येथील रूग्ण व जनता आवश्यक आरोग्य सुविधेपासून अद्यापही वंचित आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, औषधी व इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करून जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन आदिवासी विकास, वने, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त वैद्यकीय विकास संघ, उपजिल्हा रूग्णालय व राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठान अहेरीच्या संयुक्त विद्यमाने येथील धर्मराव कृषी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. सदस्य राजमाता रूक्मिणीदेवी, कुमार अवधेशवराव, प्रवीणराव आदी उपस्थित होते. यावेळी राजमाता रूक्मिणीदेवी यांनी स्व. राजे सत्यवानराव महाराज यांनी जे लोकांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न माझा मुलगा पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक अमोल गुड्डेलीवार, संचालन कृष्णा मंचालवार तर आभार मुकेश नामेवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी) ४०० जणांची आरोग्य तपासणी या शिबिरात ४०० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ३६ लोकांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉ. के. डी. मडावी, डॉ. बिश्वास, डॉ. शैलेजा मैदमवार, डॉ. सोयाम, डॉ. उमाटे, डॉ. सरोज भगत, डॉ. सत्यजीत पोतदार, डॉ. मनिष शेंडे, डॉ. दिनेश चोपडे, डॉ. प्रसन्ना मद्दिवार, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. विशाल येर्रावार, संजय उमडवार यांनी सहकार्य केले.