शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला १४ कोटींचा निधी हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 01:26 IST

सन २०१६-१७ वर्षातील रोजगार हमी योजनेच्या मंजूर कुशल व अकुशल कामांसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या नरेगा विभागाला

नरेगाच्या कामासाठी : पाच महिन्यांपासून निधीचा अभाव लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१६-१७ वर्षातील रोजगार हमी योजनेच्या मंजूर कुशल व अकुशल कामांसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या नरेगा विभागाला निधी नसल्याने अनेक ठिकाणची कामे रखडली आहेत. नरेगाच्या कुशल व अकुशल कामासाठी एकूण १४ कोटी ४३ लाख ७६ हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याचे रोजगार हमी योजनेच्या कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सन २०१६-१७ या वर्षात नरेगाच्या कुशल व अकुशल कामासाठी पुरेसा निधीच उपलब्ध नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील विविध कामे प्रभावित झाली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्रशासनामार्फत नरेगाच्या कामाचा कृती आराखडा तयार केला जातो. सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडे निधीची मागणी केली जाते. सन २०१६-१७ या वर्षात कृती आराखड्यातील विविध कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. वर्षाच्या सुरूवातीला नरेगाच्या कामासाठी निधी दिला मात्र सदर निधी अल्प होता. आता गेल्या पाच महिन्यांपासून गडचिरोली जिल्हा परिषदांच्या नरेगा कक्षाकडे निधी नसल्याने नरेगाची विविध जुनी कामे रखडलेली आहेत. सन २०१७-१८ या वर्षातील नरेगाच्या कामाला शासनाने मान्यता दिली असून याचा निधीही संबंधित यंत्रणेकडे अदा केले आहे. मात्र सन २०१६-१७ च्या कामांना निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. कुशल- अकुशल कामाच्या निधीअभावी रोहयोची कामे थंडबस्त्यात असल्याने मजूरही अडचणीत आले आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सिंचन विहिर, नाडेप, गांडूळ खत निर्मिती, सिमेंट बंधारे, शेततळे, दगड पिचिंग, मजगी आदींसह विविध कामे सन २०१६-१७ वर्षात घेण्यात आले. सदर कामे सुरू आहेत. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने या कामांसाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याचा संबंधित कामाच्या ठिकाणी व यंत्रणेकडे पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे सिंचन विहीर व इतर कामे कशी पूर्ण करावी, असा प्रश्न लाभार्थी शेतकरी तसेच यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे. निधीअभावी रोहयो कामाची गती मंदावली आहे.