शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयाचा गडचिरोली रॉयल्स संघ विजेता

By admin | Updated: March 10, 2016 02:06 IST

गडचिरोली जिल्हा न्यायालय फिरते चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी व सोमवारी घेण्यात आली.

टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचा समारोप : जिल्हा सत्र न्यायाधीश ठरले ‘मॅन आॅफ दी मॅच’चे मानकरीगडचिरोली : गडचिरोली जिल्हा न्यायालय फिरते चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी व सोमवारी घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्हा न्यायालयाचा गडचिरोली रॉयल्स संघ विजयी ठरला. या संघाला फिरते चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे हे ‘मॅन आॅफ दी मॅच’ पुरस्काराचे मानकरी ठरले. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे, जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष बोरावार, जिल्हा शासकीय अधिवक्ता प्रधान, पोलीस उपअधीक्षक एस. पी. कवडे, माजी न्यायाधीश म्हशाखेत्री उपस्थित होते. रविवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश, वकील, कर्मचारी यांनी देशभक्ती, भावभक्ती गीत सादर करून लावणी व इतर गीत सादर केले. अ‍ॅड. प्रकाश भोयर यांनी गोंडीनृत्य सादर केले. क्रिकेट सामन्याला पंच म्हणून प्रा. म्हस्के, पोलीस निरीक्षक विठ्ठल मुत्तेमवार, संजय शेरगिरे, किशोर पंचभाई तर गुणलेखक व समालोचक म्हणून देवेंद्र गडपल्लीवार व राजू जाधव यांनी काम पाहिले. त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रिकेट सामने व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या स्पर्धेत अनेक वकील मंडळींनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. (स्थानिक प्रतिनिधी)