शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हात धुण्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:01 IST

सुदृढ आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.विजय राठोड यांनी कार्यक्रमादरम्यान स्वत: हात धुवून विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात धुण्याची प्रेरणा दिली.

ठळक मुद्देजि.प. सीईओंची उपस्थिती : येवली येथील शाळेत पार पडला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुदृढ आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.विजय राठोड यांनी कार्यक्रमादरम्यान स्वत: हात धुवून विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात धुण्याची प्रेरणा दिली.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवली येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हातधुवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, डीआयईसीपीडीचे प्राचार्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.शरदचंद्र पाटील, येवलीच्या सरपंच सुरेखा भांडेकर, उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख, विषय सहायक कुणाल कोवे, विठ्ठल होंडे, गटशिक्षणाधिकारी संगीता खोब्रागडे, केंद्रप्रमुख वनमाळी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन प्रेरणादिनानिमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ दाखविण्यात आला.यावेळी हात धुण्याच्या सात पायऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. बहुतांश विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात धुण्याची सवय राहत नाही. परिणामी खेळताना खराब झालेल्या हातांनीच जेवण घेतले जाते. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडते. विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याविषयी जाणीवजागृती व्हावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी हात धुणे दिन राबविण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत झाली. यावेळी वाचन प्रेरणा दिनाचेही आयोजन करण्यात आले.