शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राने जि.प. यंत्रणा ठप्प

By admin | Updated: November 18, 2016 01:23 IST

गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जुलै २०१६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा वार्षिक

जि.प.मध्ये अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या फाईली : विकास कामांच्या नियोजनावर परिणामगडचिरोली : गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जुलै २०१६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०१६-१७ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी कामांची यादी सादर करण्याबाबत पत्र दिले. या पत्राचा आधार घेत जिल्हा परिषदेच्या विषय समित्या व सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या विकास कामांचे आराखडे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने आता रोखून धरले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी संतप्त असून या संदर्भात लवकरच राज्य सरकारकडे व न्यायालयातही दाद मागण्याच्या हालचालींना गती आली आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या शासकीय जीआरचा आधार घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र जिल्हा परिषद यंत्रणेला ग्रामीण विकास व जलसंधारण मंत्रालयाचे जीआर लागू होतात व त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था काम करीत असतात, असा युक्तीवाद जिल्हा परिषद सदस्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राला जिल्हा परिषद यंत्रणेने दुर्लक्षित करावे, अशी या सदस्यांची मागणी आहे. मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी महोदयांच्या या पत्राचा आधार घेत विकास कामांच्या फाईली प्रलंबित ठेवत आहेत. जिल्हा परिषदेला आराखडा तयार करून तो माहितीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा लागतो. त्यानंतर निधी मंजूर होऊन येतो. त्याचे नियोजन करण्याचा व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचाही पूर्ण अधिकार हा जिल्हा परिषदेचाच आहे. असे असताना विद्यमान जिल्हा प्रशासन व पालकमंत्री जिल्हा परिषदेच्या अधिकारावर गदा आणत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. एकूणच या सर्व गोंधळामुळे जिल्हा विकासावर मोठा परिणाम होत असल्याचे सदस्यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)एप्रिलमध्ये मंजूर निधीची माहितीही ठेवली दडवूनजिल्हा वार्षीक योजना सर्वसाधारण ५०५४ मार्ग व पूल २०१६-१७ यामध्ये उपलब्ध नियतव्ययाची रक्कम एप्रिल महिन्यात १५ कोटी ५० लाख रूपये मंजूर करण्यात आली. मात्र जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या नियोजन विभागाला दिली नाही. अखेरीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम, वित्त व नियोजन सभापतींनी तीन महिन्यांपूर्वी नियोजन अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. तेव्हा कुठे ८ नोव्हेंबरला या निधीची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अद्यापपर्यंत जिल्हा परिषद यंत्रणेला दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांना सहकार्य करीत नसल्याचे स्पष्ट होत आहे.