शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

By admin | Updated: February 11, 2017 01:45 IST

२४ फेब्रुवारी शुक्रवारपासून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे.

मार्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा विविध सुविधा राहणार : २४ तास वीज पुरवठ्याची सोय चामोर्शी : २४ फेब्रुवारी शुक्रवारपासून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे. सदर यात्रेदरम्यान भाविकांना त्रास होऊ नये या दृष्टीने प्रशासनातर्फे विविध सुविधा देण्यात येणार आहे. मार्र्कंडा यात्रेच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी गुरूवारी मार्र्कंडादेव येथे घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी आढावा बैठकीला प्रामुख्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.चे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपादे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवळे, भारतीय पुरातत्व विभाग नागपूरचे उपअधीक्षक डॉ. हाशमी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, पोलीस निरिक्षक किरण अवचर, संवर्ग विकास अधिकारी खामकर आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी नायक यांनी बांधकाम, विद्युत, आरोग्य, परिवहन, वन विभाग आदींकडून मार्र्कंडा यात्रेच्या तयारीची व भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. बैठकीला मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, रामप्रसाद महाराज, मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, सचिव अशोक तिवारी, उपाध्यक्ष रामेश्वर काबरा, मार्र्कंडादेवच्या सरपंच ललिता म्हरस्कोल्हे, विश्वस्त हरीभाऊ खिनखीनकर, गोपाल रणदिवे महाराज आदी उपस्थित होते. आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्न पदार्थाची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी केली जाणार आहे. तसेच विद्युत पुरवठा २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी) यंदा प्रथमच शिवलिंगाचे थेट प्रक्षेपण होणार मार्र्कंडादेव येथे मंदिर परिसर प्रवेश रांगा, पार्र्किं ग तसेच यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची नजर राहणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच यात्रेदरम्यान शिवलिंगाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून भाविक रांगेत असलेल्या ठिकाणाहून हे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. तसेच लाईव्ह वेबकास्ट सुध्दा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ओटी टेस्टद्वारे दररोज दोनवेळा केली जाणार आहे. अशी राहणार व्यवस्था यात्रे दरम्यान मार्र्कंडादेव येथील पोलीस चौकात एक खोयापाया कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यात हरविलेल्या व सापडलेल्या बालकांची नोंद घेण्यात येणार आहे. वैनगंगा नदीतील धोकादायक ठिकाणी लाल पताके व थर्माकॉल लावण्यात येणार आहे. स्तनदा माता, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी एक विशेष प्रवेश रांग राहिल. महिलांना आंघोळीसाठी दोन बंदिस्त कक्ष शॉवर व्यवस्थेसह राहतील. आरोग्याच्या दृष्टीने रूग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येणार असून महिला डॉक्टर राहिल.