शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या जाणल्या

By admin | Updated: January 25, 2017 02:05 IST

गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीमचे क्षेत्र वाढवून अधिकाकाधिक शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी

जिल्हा रेशीम कार्यालयाला भेट : आरमोरीत कोष उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीमचे क्षेत्र वाढवून अधिकाकाधिक शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कोषधागा निर्मितीचे प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार देण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. जिल्हाधिकारी नायक यांनी मंगळवारी दुपारी आरमोरी येथील जिल्हा रेशीम कार्यालयाला भेट दिली. यावेळी आयोजित केलेल्या शेतकरी कार्यशाळा प्रशिक्षणालाही भेट दिली. रेशीम प्लँट, शीतगृह, अडीपुंडा निर्मिती केंद्र, टसर अळ्यांचे किटक संगोपन केंद्र, टसर धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली. धागा तयार करण्याच्या पद्धतीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रशिक्षण कार्यशाळेला भेट देऊन कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वडसाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, डीआरडीएचे प्रकल्प संचालक बाबरे, तहसीलदार मनोहर वलथरे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी गणेश राठोड, केंद्रीय रेशीम मंडळ बंगलोरचे सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. के. के. चटर्जी, कोसे व्यापारी चंद्रशेखर देवांग, कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे, प्रा. डॉ. जयेश पापडकर, रेशीम विकास कार्यालयाचे क्षेत्र सहायक जी. सी. भैसारे आदी उपस्थित होते. रेशीम उद्योग विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्हा रेशीम विकास अधिकारी गणेश राठोड यांना दिल्या. यावेळी राठोड यांनी रेशीम उद्योगाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. (वार्ताहर) शेतकऱ्यांनी या समस्या मांडल्या गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चांगल्या दर्जाच्या कोषाला भाव मिळत नाही. त्यामुळे मार्केटिंगची व्यवस्था करून टसर कोष खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, रेशीम पिकासाठी २५ हजार रूपयापर्यंत कर्ज देण्यात यावे, महिला बचत गटांना कोषधागा निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात यावे, कृषी गोदामाच्या धर्तीवर कोष गोदाम निर्माण करण्यात यावे, कोष धागा निर्मिती केंद्र उभारण्यात यावे, जिल्ह्यातील टसर शेतकऱ्यांना शासकीय दरामध्ये मागणीनुसार बिज पुरवठा शासनाकडून करण्यात यावा तसेच जिल्हाबाहेरील व्यापारी अंडीपुडा विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करावी. बिज उत्पादकांना बळकटीकरणासाठी अनुदान देण्यात यावे आदी मागण्या कोष उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नायक यांच्यापुढे मांडल्या.