शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत नोटबंदीने ग्रामीण भाग अडचणीत

By admin | Updated: November 16, 2016 01:59 IST

चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० च्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने

५० टक्के शाखांत व्यवहार ठप्प : सहकारी बँकेत नोटा स्वीकारण्यास मनाईच्या निर्णयाचा फटकागडचिरोली : चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० च्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने अचानक मनाई केली असून सोमवारी दुपारनंतर आलेल्या या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची मोठी अडचण झाली आहे.गडचिरोली हा राज्यातील दुर्गम जिल्हा आहे. या राज्यात अत्यंत दुर्गम गावापर्यंत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याच शाखा आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचे जाळे केवळ तालुका मुख्यालय व काही ठराविक मोठ्या गावातच आहे. जिल्ह्यात ११९ बँक शाखा असून त्यापैकी ५५ शाखा एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. तसेच जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम सुध्दा दुर्गम गावांमध्ये आहे. ८ नोव्हेंबरला नोटा बंदीचा निर्णय आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक शेतकरी, नागरिक व बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यावर जुन्या नोटा जमा करून नव्या नोटा वितरणाचे काम सुरू केले होते. परंतु अचानक सोमवारी जुन्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय आल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणावर याचा मोठा प्रभाव पडणार आहे. भामरागड तालुक्यात जवळजवळ ५० टक्के नागरिकांची खाती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे. तर कोरची तालुक्यातही ५०० रूपयांची नोट बदलविण्यासाठी नागरिकांना ५० किमीचे अंतर चालून येऊन यासाठी ३०० रूपये खर्च करावे लागत आहे. ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा आदी दुर्गम तालुक्यातील सर्वच गावांची आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी अनेक नागरिक व ग्राहक जुळलेले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मंगळवारी कोणतीही गर्दी दिसून आली नाही. ग्रामीण भागातील नागरिक तालुका मुख्यालयाच्या शाखांमध्ये गेले. मात्र तेथे त्यांच्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली. त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष बाब म्हणून लोकांच्या सोयीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला माहिती द्यावी. (प्रतिनिधी)रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयाची माहिती सोमवारी मिळाली. हा निर्णय देशव्यापी असून या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बँक खातेदार, शेतकरी यांची मोठी अडचण होणार आहे. आमच्या सर्वच शाखा रिमोट एरियात आहेत. या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरून काही हालचाली होऊ शकतात. - सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककोरची तालुक्यात जिल्हा को-आॅपरेटीव्ह बँकेच्या कोटगूल, बेतकाठी व कोरचीत तीन शाखा आहेत. तर राष्ट्रीयकृत बँकेची केवळ कोरचीतच एक शाखा सुरू आहे. सहकारी बँकेच्या कोरचीतील शाखेत ३४ हजार बँक खाते आहेत. बेतकाठी व कोटगूल शाखेत प्रत्येकी सात हजार बँक खाते आहेत. त्यामुळे सहकारी बँकेत पैसे बदलून द्यावे.- नंदकिशोर वैरागडे, सामाजिक कार्यकर्ते, कोरची