शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती

By admin | Updated: June 20, 2017 00:48 IST

आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक सिकलसेल दिन सोमवारी जिल्हाभर साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

रूग्णालयात कार्यक्रम : धानोरा, अहेरी, कुरखेडा, राजगाटा चेक येथे मार्गदर्शन; महिला व किशोरवयीनांना आजारांची दिली माहितीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक सिकलसेल दिन सोमवारी जिल्हाभर साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक सिकलसेल दिनानिमित्त सिकलसेल आजारबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभुर्णे, डॉ. गेडाम, डॉ. नरडंगे, सिकलसेल पर्यवेक्षक गणेश कुळमेथे, टी बी पर्यवेक्षक गिरीश लेनगुरे, डेविड गुरनुले, गौतम राऊत आदी उपस्थित होते. गिरीश लेनगुरे यांनी सिकलसेल आजारबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ टेंभुर्णे यांनी सिकलसेल आजारात घ्यावयाची काळजी व नियमित तपासणी याविषयी मार्गदर्शन केले. लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.गडचिरोली तालुक्यातील राजगाटा चेक येथे अंगणवाडी केंद्रात जागतिक सिकलसेल दिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गरोदर माता, किशोरवयीन मुलींना सिकलसेल आजार, लग्नापूर्वी व गरोदरपणात तपासणी, निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभाग व आरोग्यधाम संस्था कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला अमिर्झाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैलेश जांभुळे, सिकलसेल समन्वयक उमाकांत हर्षे, आरोग्य सेवक अनिल मंगर, जयंत कत्तुरवार, सविता जेंगठे व गावातील मुली तसेच महिला उपस्थित होत्या.अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने आयसीटीसी विभागात जागतिक सिकलसेल दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सिकलसेल पर्यवेक्षक प्रवीण दुर्गे यांनी सिकलसेल वाहक व सिकलसेल रूग्णांनी विवाहापूर्वी तपासणी करून भावी पिढीला होणारा संभाव्य धोका टाळावा, सिकलसेल रूग्णांनी ओळखपत्रे बनवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पावसाळ्याला सुरूवात झाली असल्याने निरोगी आरोग्यासाठी पाणी उकडून प्यावे, मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. संचालन सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप डेकाटे यांनी केले. यशस्वीतेसाठी व्यंकटेश डिकोंडा, निखिल कोंडापर्ती, पडको, विनित खोके व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला. कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आरोग्यधाम स्वयंसेवी संस्थेच्या वतीने रक्तदात्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी संत निरंकारी मंडळाचे प्रकाश रामानी, दिलीप निरंकारी, अजय पुस्तोडे व अन्य लोकांचा सिकलसेल रूग्णांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वैैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्वा, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ लांजेवार, आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश कटरे उपस्थित होते. संचालन विजय सोनटक्के तर आभार खुशलता मलगाम यांनी मानले.