पाेलीस दादालाेरा खिडकीचे उद्घाटन जपतलाईचे पाेलीस पाटील नरेश करंगामी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येरकडचे सरपंच वासुदेव उसेंडी हाेते. यावेळी प्रभारी अधिकारी नीलेश बारसे, पीएसआय सचिन ठाकरे, गंधकवाड, जायभाय उपस्थित होते. सदर खिडकीच्या माध्यमातून पोलीस व जनता यांच्यातील संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने परिसरातील जनतेची अडचण विचारात घेऊन हद्दीतील लोकांना ३७२ जॉबकार्ड वाटप करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत कार्ड योजनेअंतर्गत ५० आयुष्मान भारत कार्ड, जात प्रमाणपत्राकरिता कागदपत्रे घेण्यात आली. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा धानोरा यांच्यामार्फत १७ लोकांचे खाते काढण्यात आले. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या २७ परवान्यांचे लाेकांना वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेचे पाच प्रस्ताव जमा करण्यात आले. तसेच पॅन कार्ड, आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली. प्रभारी अधिकारी नीलेश बारसे यांनी प्रास्ताविक केले.
येरकड येथे जाॅब कार्डसह विविध प्रमाणपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST