शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:54 IST

देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी सीआरपीएफ १९१ बटालियनच्या वतीने गरजू पाच महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देसीआरपीएफचा उपक्रम : कुथे पाटील कॉन्व्हेंटमध्ये कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी सीआरपीएफ १९१ बटालियनच्या वतीने गरजू पाच महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी होते. प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, ईश्वर कुमरे, अ‍ॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीष मोटवानी, संस्थासचिव योगराज कुथे, पायल हरीष मोटवानी, मेरी विल्सन, माजी नगरसेविका निलोफर शेख, महादेव चांदेवार, मुख्याध्यापक जॉन उपस्थित होते.जेसा मोटवानी यांनी मार्गदर्शन करताना गरजू महिलांना सीआरपीएफने शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्याने त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असे गौरवोद्गार काढले. यावेळी उपस्थित इतरही मान्यवरांनी सीआरपीएफच्या या सामाजिक बांधिलकी असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.देसाईगंज येथील छाया देवराव डांगे, वैशाली नंदू मेश्राम, जयवंता बनकर, दीक्षा ढवगाये, मीना सिंगाडे या गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.