मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा होते. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पोलीस निरीक्षक एस.एल. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक विनोद होडबे, कृषी सहायक व्ही.आर. खोब्रागडे उपस्थित होते. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून शेवगा शेतीसाठी शेवगा राेपट्यांचे वितरण केले जात आहे. शेवगा शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा यांनी केले. कृषी सहायक होबडे यांनी शेवगा पिकाची लागवड व घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. कृषी सहायक खोब्रागडे यांनी शेवगा शेंगामध्ये माेठ्या प्रमाणात जीवनसत्त्व असल्याने शेवगा शेंगांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे, असे प्रतिपादन केले. पीएसआय नंदकुमार शिंब्रे यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार व्यक्त केले. यशस्वितेसाठी पोलीस हवालदार चंद्रकांत डोंगरे, रमेश कुशराम, पोलीस शिपाई नरेंद्र धोंडणे, शेखलाल मडावी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेळाव्याला रेगडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
210421\21gad_9_21042021_30.jpg
===Caption===
मार्गदर्शन करताना उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रणिल गिलडा.