शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना साहित्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:33 IST

सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात झिंगानूर उपपोलीस ठाण्याच्या वतीने कल्लेड येथे रविवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला.

ठळक मुद्देकल्लेड येथे जनजागरण मेळावा : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ऑनलाईन लोकमतझिंगानूर : सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात झिंगानूर उपपोलीस ठाण्याच्या वतीने कल्लेड येथे रविवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक साहित्य, कपडे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोंजेडचे सरपंच वंजा मडावी, आरोग्य विभागाचे सडमेक, प्रभारी पोलीस अधिकारी रोहित बंडगर, क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड यांच्यासह ग्रामसेवक, वन विभागाचे कर्मचारी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांना आदिवासी पारंपरिक रेला नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पोलीस शिपाई समय्या मडावी यांनी बोली भाषेत लोकांना पोलीस विभागाच्या आत्मसमर्थन योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्ग मिळणाºया लाभाचे विवेचन त्यांनी यावेळी केले. प्रभारी पोलीस अधिकारी बंडगर यांनी विविध शासकीय योजना, नक्षल गावबंदी योजनेची माहिती देऊन या योजनेअंतर्गत गावांनी लखपती व्हावे, बॅनरमधून नक्षलविरोधी प्रचार करून नागरिकांनी नक्षल्यांना थारा देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.सदर मेळाव्यात महिलांना साडी, पुरूषांना धोतर, लुंगी, चप्पल, स्टिल डब्बे तसेच विविध संसारपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. याशिवाय शाळकरी मुलांना स्कूल बॅग, पाटी, चप्पल, वही, पेन क्रीडा साहित्य प्रदान करण्यात आले. सरकारी निधीचा वापर करण्यासाठी लोखंडी बकेट व दोरीचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकाना गाव विकासाबाबत मार्गदर्शन केले.या मेळाव्याला कल्लेड परिसरातील जवळपास १५० लोक उपस्थित होते. स्नेह भोजनाने या मेळाव्याचा समारोप झाला.