शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

१६२ लाभार्थ्यांना गॅसचे वितरण

By admin | Updated: May 8, 2016 01:15 IST

पर्यावरण संतुलीत राहावे, जंगलतोड होऊ नये, तसेच नागरिकांचा जंगलावरील भार कमी व्हावा, या उद्देशाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने

जंगलतोडीच्या दुष्परिणामावर मार्गदर्शन : जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयाचा पुढाकारजिमलगट्टा : पर्यावरण संतुलीत राहावे, जंगलतोड होऊ नये, तसेच नागरिकांचा जंगलावरील भार कमी व्हावा, या उद्देशाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने परिसरातील अनुसूचित जाती व जमातीच्या एकूण १६२ लाभार्थ्यांना सवलतीवर गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टाचे वन परिक्षेत्राधिकारी कुसनाके, कमलापूरचे वन परिक्षेत्राधिकारी लाड, भाजपचे पदाधिकारी रवी नेलकुद्री, पोलीस उपनिरिक्षक शशिकांत मुसळे, उपसरपंच मदना कोडापे, पुलय्या वेलादी, संतोष येलमुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वनपरिक्षेधिकारी कुसनाके यांनी जंगलतोडीचे मानवावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. तसेच गॅस सिलिंडर मिळालेल्या लाभार्थ्यांनी याचा पुरेपूर वापर करून परिसरात जंगलतोड करू नये, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पी. जी. देशपांडे यांनी केले तर आभार एस. एस. बाला यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनपाल नैताम, कन्नाके, घागरगुडे, चौके यांनी सहकार्य केले. जिमलगट्टा, येदरंगा, रसपल्ली, गुंडेरा, अर्कापल्ली, मरपल्ली, सुध्दागुडम, उमानूर, जोगनगुडा, गोविंदगाव येथील एससी, एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचा लाभ यावेळी देण्यात आला. वन विभागाच्या वतीने पाच वर्षांपासून गॅस सिलिंडर वाटपाचा जम्बो कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र वन विभागामार्फत गॅस रिफिलिंगची व्यवस्था दूरवर करण्यात आल्याने लाभार्थी अडचणीत आहेत.