शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ७४ हजार ९१६ दाखले वितरित

By admin | Updated: August 1, 2014 00:16 IST

राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात आॅगस्ट २०१२ पासून सुवर्ण जयंती राजस्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर २०१३ ते जून २०१४ पर्यंत या कार्यक्रमाचे

५८६ शिबिर : प्रशासन आपल्या दारी उपक्रमगडचिरोली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात आॅगस्ट २०१२ पासून सुवर्ण जयंती राजस्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर २०१३ ते जून २०१४ पर्यंत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सन २०१३-१४ या वर्षात जिल्हाभरात एकूण ५८६ शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून एकूण ७४ हजार ९१६ दाखले वितरित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानांतर्गत सन २०१३-१४ या वर्षात गडचिरोली तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने ५३ शिबिर घेण्यात आली. या शिबिरात एकूण ५ हजार ७७६ दाखले वितरित करण्यात आले. धानोरा तालुक्यात ३५ शिबिर आयोजित करून एकूण ३ हजार १०० दाखले वितरित करण्यात आले. चामोर्शी तालुक्यात ४३ शिबिर आयोजित करून ५ हजार ८८० दाखले वितरित करण्यात आले. मुलचेरा तालुक्यात १६ शिबिराच्या माध्यमातून १ हजार ८५१ तर देसाईगंज तालुक्यात २१ शिबिर आयोजित करून १० हजार १३२ दाखले वितरित करण्यात आले. आरमोरी तालुक्यात ५४ शिबिर आयोजित करून ८ हजार ८७८ तर कुरखेडा तालुक्यात २६ शिबिराच्या माध्यमातून एकूण ४ हजार ८५३ दाखले वितरित करण्यात आले. कोरची तालुक्यात २६ शिबिराच्या माध्यमातून १ हजार ६०४, अहेरी तालुक्यात ६९ शिबिराच्या माध्यमातून एकूण ७ हजार २७७ दाखले वितरित करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात ७६ शिबिर आयोजित करून एकूण १ हजार ६५२ तसेच एटापल्ली तालुक्यात १०५ शिबिर आयोजित करून एकूण ११ हजार ४३१ दाखले वितरित करण्यात आले आणि अतिदुर्गम भामरागड तालुक्यात ६२ शिबिर आयोजित करून एकूण २ हजार ४८२ दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले. वितरित करण्यात आलेल्या दाखल्यांमध्ये जात, रहिवासी, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न तसेच अधिवास प्रमाणपत्रांचा समावेश आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात ४० महसूल मंडळांतर्गत २०१३-१४ या वर्षात एकूण २०० फेरफार अदालती घेण्यात आल्या असून यामध्ये एकूण ९ हजार १४९ फेरफाराच्या नोंदी निकाली काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राजस्व अभियानांतर्गत वर्षभरात १०४ अतिक्रमीत पांदन रस्त्यांपैकी ८५ पांदनरस्ते अतिक्रमण विरहित करण्यात आले. या महसूल मंडळावर एकूण १०५ महसूल अदालती आयोजित करण्यात आल्या. यामध्ये ३३१ प्रकरणात कारवाई करण्यात आली. भूसंपादन प्रकरणात एकूण ६२ निवाड्याचे ४६ कजाप प्राप्त झाले. सदर कजापचे फेरफार घेऊन ५५७ सातबाऱ्याची दुरूस्ती करण्यात आली असल्याचीही माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. राजस्व अभियानांतर्गत एकूण १ हजार २२६ गावात गाव नमुना ८ अ चे चावडी वाचन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)