शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या हस्तक्षेपाची गरज : मेडीगड्डा बॅरेजचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरण्यास सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मेडीगड्डा बॅरेजचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तेलंगणा व महाराष्ट्र शासनाविषयी असंतोष खदखदत आहे. भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. ऐन काढणीदरम्यान शेतामध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे, तेलंगणा सरकारने जमीन अधिग्रहण करून मोबदला न देताच पाणी अडविण्यास सुरूवात केली आहे. वडधम, आयपेठा, पोचमपल्ली, तुमनूर माल, पेंटीपाका, मुंगापूर या गावांमधील जवळपास २३८.९२ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे. यापैकी काही जमिनीची खरेदी झाली आहे. तर काही जमिनीची खरेदी अजूनपर्यंत झालेली नाही. आणखी १२ गावातील जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. पण जमिनीची खरेदी प्रक्रिया आटोपण्याआधीच पाणी अडविले जात आहे. या धरणाचा लाभ तेलंगणाला होत आहे. बुडीत क्षेत्र मात्र सिरोंचा तालुक्याच्या वाट्याला आले आहे. या ठिकाणी बॅरेज बांधकामाला महाराष्ट्र शासनाने विरोध करणे आवश्यक होते. मात्र कोणताही विरोध न केल्याने तेलंगणा सरकारने धरण बांधले आहे. उन्हाळभर गेट बंदच राहिल्यास आणखी काही शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.शेतकरी करणार आंदोलनमेडीगड्डा बॅरेज महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या गोदावरी नदीवर बांधले आहे. त्यामुळे मेडीगड्डा धरणाचा प्रश्न आंतरराज्यीय बनला आहे. सिरोंचातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर तेलंगणा सरकारला काहीच सोयरसूतक नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने त्यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. विशेष करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून तेलंगणा सरकारवर दबाव वाढविणे आवश्यक आहे. मात्र हे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारची हिंमत वाढत चालली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती