शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऋषिपंचमीच्या व्रताला कोरोनाचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST

कोरोनामुळे मागील वर्षीही ऋषिपंचमी व्रत माेजक्या महिलांना अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी ...

कोरोनामुळे मागील वर्षीही ऋषिपंचमी व्रत माेजक्या महिलांना अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यतः हे व्रत गणेशचतुर्थीच्या नंतरच्या दिवशी आणि हरितालिकेच्या व्रताच्या दोन दिवसांनंतर केले जाते. हे व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य देणारे असल्याचे मानले जाते. या दिवशी देवदेवतांचे पूजन केले जात नाही, तर पंचमीच्या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. शास्त्रातील मान्यतेनुसार ऋषिपंचमीचे व्रत शुद्ध मनाने केल्यास सर्व दुःख दूर होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळते. या वर्षी ऋषिपंचमी शनिवार ११ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचा दिवस व्रत ठेवण्यासाठी फलदायक असतो. पौराणिक मान्यतेनुसार ऋषिपंचमीचे हे व्रत स्त्रियांनी केल्यास त्यांना सुख-शांती आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सुहासिनी स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते. या दिवशी गंगास्नानाचेही महत्त्व असते. महिला या दिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि सुख, शांती व समृद्धीसाठी हे व्रत करतात. यात पूजा केल्यानंतर ऋषिपंचमीच्या व्रताची कथा ऐकली जाते आणि पंडितांना भोजन देऊन व्रताचे उद्यापन करण्यात येते. अविवाहित स्त्रियांसाठीही हे व्रत महत्त्वपूर्ण व फलदायी मानले जाते दरवर्षी मार्कडा देव येथे वैनगंगा तीरावर वसलेले मार्कण्डेश्वर मंदिर या पवित्र तीर्थक्षेत्र स्थळी ऋषिपंचमी व्रत केले जाते मात्र यावर्षीही हे व्रत महिलांना कोरोनामुळे करता येईल की नाही ही शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ऋषिपंचमी दिनी मार्कंडास्थळी चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून याबाबत तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी पोलीस प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत.

आता सणासुदीचे दिवस असून सण-समारंभ साजरा करताना गर्दी होऊन कोराेना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे धार्मिक स्थळी भाविकांना प्रवेश करण्यास तसेच धार्मिक पूजा करण्यास मनाई करण्याकरिता प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे, साध्या पद्धतीने महिलांनी घरगुती ऋषिपंचमी व्रत पार पाडावे, असे आवाहन तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी केले आहे.