शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या रोषानंतर निवड रद्द

By admin | Updated: May 26, 2016 02:22 IST

तालुक्यातील वडेगाव गट ग्राम पंचायतींतर्गत येणाऱ्या धुटीटोला येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस निवड प्रक्रिया सरपंच, सचिव यांनी हेतुपुरस्सर व ग्रामसभेच्या संमतीशिवाय राबविली.

धुटीटोलावासीयांची पं.स.वर धडक : सरपंच, सचिवाकडून परस्पर सेविका व मदतनिसांची निवडकुरखेडा : तालुक्यातील वडेगाव गट ग्राम पंचायतींतर्गत येणाऱ्या धुटीटोला येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस निवड प्रक्रिया सरपंच, सचिव यांनी हेतुपुरस्सर व ग्रामसभेच्या संमतीशिवाय राबविली. स्वमर्जीने खोट्या सह्या घेत निवड प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी पंचायत समितीवर धडक देऊन ठिया आंदोलन केले. ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने निवड प्रक्रियेला स्थगिती देत झालेली निवड रद्द करण्याचे आदेश सरपंच व सचिवांना दिले. धुटीटोला अंगणवाडी केंद्र क्रमांक ३ मधील अंगणवाडी सेविका व केंद्र क्रमांक १ मधील अंगणवाडी मदतनिस यांच्या निवडीसाठी १७ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर सभेची माहिती सरपंच व सचिव यांनी हेतुपुरस्सर सहकारी सदस्य व धुटीटोला येथील ग्रामस्थांना दिली नाही व सभेचा कोरम पूर्ण करण्याकरिता मर्जीतील लोकांच्या खोट्या सह्या घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखविले, असा आरोप धुटीटोला येथील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केला व सदर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी पंचायत समितीवर धडक देऊन दुपारी १२ वाजेपर्यंत ठिया आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन बालविकास प्रकल्प अधिकारी फुलझेले यांनी निवड प्रक्रिया रद्द झाल्यासंदर्भातील आदेशाची प्रत आंदोलकांना दिली. तसेच आंदोलकांशी या विषयावर सविस्तर चर्चाही केली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत आंदोलन मागे घेतले. आंदोलनाचे नेतृत्त्व जि. प. सदस्य निरांजनी चंदेल, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, पं. स. उपसभापती बबन बुद्धे यांनी केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य बनस चावर, ब्रह्मकुमार जमकातन, निर्मला चंद्रमा, कैलाश सोंजाल, कैजाबाई बागडेरिया, माजी सरपंच आनंदराव जुमनाके, नरेंद्र तिरणकर, राकेश चव्हाण, मंगरू बन्सोड, भाग्यवान जनबंधू, यशवंत सुकारे, मोहन निनावे, रोहिदास मिरी, नरेंद्र शेंडे, मनिराम जमकातन, ऋषी कुमरे, बोलचंद्र घाटघुमर, बहाल केवास, अतुल जुळा, हिरामण लाडे, सामसाय कोरेटी व धुटीटोला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)नव्याने घ्या ग्रामसभाधुटीटोलावासीयांच्या आंदोलनाची व संतप्त ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करीत अंगणवाडी सेविका व मदतनिसांची निवड प्रक्रिया स्थगित करण्याचे व झालेली निवड रद्द करण्याचे आदेश सरपंच व सचिव यांना दिले. ग्रामसभा आयोजित करून नव्याने निवड प्रक्रिया राबवावी, अशा आशयाची आदेशप्रत आंदोलनकर्त्यांना दिली.