शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावर रोगांचा कहर

By admin | Updated: September 17, 2015 01:46 IST

जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असताना वातावरणातील बदलाचा परिणाम धान पिकावर होत आहे.

शेतकरी संकटात : बेरडी, करपा, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा गडचिरोली तालुक्यात प्रादुर्भावगडचिरोली : जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असताना वातावरणातील बदलाचा परिणाम धान पिकावर होत आहे. गडचिरोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेरडी, पाने गुंडाळणारी अळी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव धान पिकावर झाल्याने यावर उपाययोजना करताना शेतकरी संकटात सापडला आहे. सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील अडपल्ली, गोगाव, महादवाडी, कुऱ्हाडी, चुरचुरा, नवरगाव, धुंडेशिवणी, कळमटोला, पिपरटोला, अमिर्झा, चांभार्डा, मरेगाव आदी गावांमध्ये धान पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. धान पिकावर बेरडी, पाने गुंडाळणारी अळी, करपा यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने रोवणीची कामेही उशिरापर्यंत आटोपली. परिणामी हलक्या व मध्यम प्रतिच्या धानाची रोवणीची मुदत निघून गेली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रोवणी झाल्याने धान पीक जोमात येऊ शकले नाही. शिवाय तुरळक पाऊस, बदलत्या वातावरणाचा परिणाम धान पिकावर होऊन अनेक किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर झाला. गडचिरोली तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी जय श्रीराम, अक्षय, पंकज, कलश, एम. टी. यू १०१०, एम. टी. यू. १०११ आदी धान पीक वाणांची लागवड केली आहे. पीक अधिक जोमात यावे, याकरिता शेतकरी धान पिकाची रोवणी करताना चिखलावर रासायनिक खत व तणनाशक कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र फवारणीमुळे अनेकदा वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. चिखलणीच्या वेळी नत्र खताचा अधिक वापर झाल्यास किडीचा प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांच्या धान बांधावर मोठी झाडे असल्यास त्यांची नियमित सावली पडून झाडाखालील सावलीमधील धान लुसलुसीत पडतो. अशा ठिकाणी बेरडी व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून धान पिकावरील कीड नियंत्रण व रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)