शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आजाराने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 02:17 IST

तापाने फणफणत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुका

काटेपल्लीतील घटना : बोगस डॉक्टराकडे झाला होता उपचारअहेरी : तापाने फणफणत असलेल्या एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या काटेपल्ली येथे बुधवारी घडली. पावना शंकर मामिडपल्ली असे मृतक शाळकरी मुलीचे नाव असून ती देवलमारी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकत होती. पावना हीची प्रकृती शुक्रवारपासून बिघडली. तिला ताप येत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी देवलमारी येथे प्राथमिक आरोग्य पथकात औषधोपचारासाठी न नेता शासनाची परवानगी नसलेल्या देवलमारी येथील वासुदेव बालराजू नामक बोगस डॉक्टराकडे नेले. डॉ. बालराजू यांनी सदर मुलीवर औषधोपचार सुरू केला. मंगळवारी रात्री या डॉक्टरने पावनाला इंजेक्शन दिले. मात्र बुधवारी सकाळी पावनाची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. डॉ. वासुदेव बालराजू याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसल्याचे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. बालराजू हा मूळचा तेलंगणा राज्याच्या करिमनगर जिल्ह्यातील बांगलोरू (सुराराम) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून देवलमारी येथे दवाखाना उघडून सदर डॉक्टरने वैद्यकीय व्यवसायाची दुकानदारी सुरू केल्याची माहिती आहे. बालराजू प्रमाणेच देवलमारी गावात आणखी दोन ते तीन बोगस डॉक्टर असल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. शासनातर्फे नागरिकांच्या आरोग्य व वैद्यकीय सुविधेसाठी दरवर्षी कोठ्यवधी रूपये खर्च करण्यात येतात. औषधोपचारासाठी शासनाने अनेक ठिकाणी शासकीय रुग्णालयाची सोय केली आहे. मात्र दुर्गम भागातील अनेक अशिक्षित कुटुंब शासकीय रुग्णालयात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घेत नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. (प्रतिनिधी)