शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावर रोगांचे आक्रमण

By admin | Updated: August 23, 2014 23:59 IST

मागील १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने वाढत्या उष्णतामानामुळे धान पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरेगाव परिसरात उष्णतेमुळे करपा,

कोरेगाव/चोप : मागील १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने वाढत्या उष्णतामानामुळे धान पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरेगाव परिसरात उष्णतेमुळे करपा, गाद, खोड किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे धान पीक संकटात सापडले आहे. शिवाय पावसाअभावी अनेक शेतामध्ये वाळवी लागल्याने धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी ८ ते १० गावांमधील शेतकऱ्यांच्या पोळा सणावर धान पिकावरील रोगामुळे विरजन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसाअभावी उष्णतामानात वाढ होऊ धान पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. पोळा सण अगदी तोंडावर असतांना कीटकनाशके घ्यावे की, पोळा सण साजरा करावा, अशी द्विधास्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. रोजीरोटी करून पोळा सणासाठी गोळा केलेले पैसे शेतकरी आता कीटकनाशके खरेदी करण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा महत्वपूर्ण सण असलेला पोळा यंदा कोरडाच जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे रोग व पावसाअभावी शेतकरी हतबल झाला आहे. कोरेगाव परिसरात धान पिकावर करपा, खोड किडीचा प्रादुर्भाव झाला असून अनेक धानपीक रोगांच्या आक्रमणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत. पिकांना पाण्याची व्यवस्था करावी की रोगांपासून पिकांचे रक्षण करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरेगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कृषी विभागामार्फत सुटीवर कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक उपलब्ध होत नसल्याने पीक संवर्धनासाठी केवळ मोफत सल्ला देणाऱ्या कृषी विभागाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न झाल्यास रोगांमुळे धानपीक पूर्णत: नष्ट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. परिणामी अगदी तोंडावर असलेल्या पोळा सणावर शेतकऱ्यांचा निरूत्साह भारी पडण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने पुढाकार घेऊन कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना खत व कीटकनाशकांचा सुटीवर पुरवठा करावा, अशी मागणी कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)