शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कडक प्रशासनाची सर्वत्र चर्चा

By admin | Updated: May 22, 2014 23:53 IST

नियमबाह्य बदल्या व पात्र नसलेल्या लोकांना महत्वाच्या जागांवर बसविणे तसेच प्रतिनियुक्त्या करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य नेहमीच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर दबाव टाकून

गडचिरोली : नियमबाह्य बदल्या व पात्र नसलेल्या लोकांना महत्वाच्या जागांवर बसविणे तसेच प्रतिनियुक्त्या करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य नेहमीच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर दबाव टाकून आपले काम करवून घेत होते. परंतु गडचिरोली जिल्हा परिषदेत कार्यरत नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी अंत्यत कठोर पध्दतीने प्रशासन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही नियमबाह्य काम करण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिल्या असल्यामुळे सध्या जि.प.चे सत्ताधारी पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले आहे. बदल्यांचा मोसम असून लाभार्थी पैशाचे बंडल हाती घेऊन उभा समोर दिसत असतानाही पदाधिकारी नियमबाह्य काम मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून करवून घेऊ शकत नाही, अशी जिल्हा परिषदेत चर्चा आहे. त्यामुळे काहींनी सभेमध्ये ठराव पारित करण्यासाठी आता वसुली सुरू केली आहे. काही ठराविक अधिकार्‍यांच्या हिताचे ठराव मिटींगमध्ये मंजूर करून घेऊन अधिकार्‍यांवर आपला वचक बसविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यप्रणालीचे विविध कर्मचारी संघटना व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे. बर्‍याच वर्षानंतर चांगल्या अधिकारी मिळाल्यात अशी लोकांमध्ये चर्चा आहे. यापूर्वी कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बदल्यांचे दुकानच उघडले होते. पदाधिकारी सांगतील त्याच्या बदल्या ठराविक रक्कम घेऊन केल्या जात होत्या. अनेक ब वर्ग वैद्यकीय अधिकार्‍यांना अ वर्गाचे पदभारही देण्याचे काम या जिल्हा परिषदेत झाले. एकाच वर्षात एकाच कर्मचार्‍याची दोनवेळा बदलीही करण्याचे पूण्यकर्मही गतकाळात पार पाडल्या गेले. त्यामुळे अशा सवयीतून प्रशासकीय काम करणारे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सीईओंंच्या कायदेशीर कामकाजामुळे कमालीचे हतबल झाले आहेत. ‘अच्छे दिन कब आयेंगे’ याची त्यांना प्रतीक्षा आहे.