लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पाेटेगाव येथील गाेटूल भवनात तालुका महाग्रामसभा स्वायत्त परिषदेची सभा बुधवारी पार पडली. या सभेत गाव विकासाविषयी चर्चा करण्यात आली.
सभेला पाेटेगाव, पाविमुरांडा, घाेट, गिलगाव, खुटगाव इलाक्यातील भुम्या, गावपाटील, सरपंच, ग्रामसभा अध्यक्ष आदी उपस्थित हाेते. या परिषदेत २०२१ या वर्षात तेंदूपत्ता व बांबूचा दर ठरविण्यात आला. तेंदूपत्त्याला प्रती गाेणी १५ हजार रुपये व बांबूला प्रती बंडल १३० रुपये दर ठरविण्यात आला. यावर येणारा इतर खर्च कंत्राटदाराने करायचा आहे, असे ठरविण्यात आले. तसेच जनगणनेदरम्यान गाेंडीधर्म किंवा काेयाधर्म अशी उल्लेख करण्याविषयी चर्चा झाली.
यावेळी मालता मडावी, शिवाजी नराेटे, महेश उसेंडी, याेगराज कड्यामी, बंडू झुरी, माराेती हिचामी, गणू नराेटे, सुखदेव सुरपाम, अभिमन्यू सुरपाम उपस्थित हाेते.