शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:54 IST

आलापल्ली येथे उपविभागीय वनाधिकारी म्हणून एन.एस.देवगडे हे रूजू झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.

ठळक मुद्देउपविभागीय वनाधिकारी रूजू : विविध संघटनांनी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली येथे उपविभागीय वनाधिकारी म्हणून एन.एस.देवगडे हे रूजू झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक वनसंरक्षक एच.जी.मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी के.डी.पाटील, पी.एस.आत्राम, कार्यालय अधीक्षक एच.बी.राठोड, मुख्य लेखापाल पी.एस.बर्लावार यांच्यासह विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, वनकर्मचारी पतसंस्था, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना, वन सामाजिक वनीकरण, कार्यालयीन कर्मचारी संघटना, कास्ट्राईब वनकर्मचारी संघटना, मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.देवगडे हे महाराष्ट्र वनसेवा २०१४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते वनप्रबोधिनी चंद्रपूर येथे संचालक म्हणून कार्यरत होते. नावीण्यपूर्ण अध्यापनाच्या पद्धतीबाबत ते वनाधिकाºयांमध्ये लोकप्रिय आहेत. देवगडे हे तरूण रक्ताचे अधिकारी असल्यामुळे वनतस्करी, शिकार व वाळू माफियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा वनकर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे मार्गदर्शन सहायक वनसंरक्षक एच.जी.मडावी यांनी केले.आलापल्ली वनविभागातील वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर आपल्यास्तरावरील समस्या तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासन उपविभागीय वनाधिकारी एन.एस.देवगडे यांनी केले.संचालन वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उमाजी गोवर्धन तर आभार महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे सचिव रमेश रामटेके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आलापल्ली वनविभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग