लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या समस्यांबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी चर्चा केली.नगर परिषदेमध्ये मागील २० वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर सफाई कामगार कार्यरत आहेत. १९९३ ते २००० या कालावधीत रोजंदारी तत्त्वावर असलेल्या सफाई कर्मचाºयांना नगर परिषदेमध्ये कायम करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतमधील कर्मचाºयांना नगर पंचायतीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे तसेच नगर परिषद संचालनालयाच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य कर्मचाºयांप्रमाणेच १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, २४ वर्षांची आश्रासित पदोन्नती लागू करावी, १९९३ पूर्वीच्या रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे, ९० टक्के कर वसुलीची अट रद्द करावी आदी मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करून याविषयी चर्चा केली. राज्यभरातील नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी बोलविले होते.चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगर परिषद संचालनालयाचे संचालक विरेंद्रसिंह उपस्थित होते. सफाई कामगारांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष चरणसिंग टांक, पी. बी. भातकुले, राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ भुगे, सरचिटणीस रामेश्ववर वाघमारे, मुख्याधिकारी संघटनेचे सरचिटणीस सुधीर राऊत उपस्थित होते. या बैठकीमुळे सफाई मजूर कामगारांच्या समस्या निकाली लागणार, अशी आशा निर्माण झाली आहे.
सफाई मजुरांच्या समस्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:15 IST
नगर परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या समस्यांबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी चर्चा केली.
सफाई मजुरांच्या समस्यांवर चर्चा
ठळक मुद्देकायम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : यापूर्वी काढलेल्या मोर्चाची घेतली दखल