शिक्षणमंत्र्यांची उपस्थिती : मंत्रालयात धोरणात्मक निर्णय गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या बंगाली माध्यमांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या बंगाली शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बंगाली माध्यमाच्या ४० पेक्षा अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अध्यापणाचे कार्य करणाऱ्या बंगाली भाषिक शिक्षकांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या शिक्षकांनी जि.प. प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर बंगाली माध्यमांच्या शिक्षकांनी आमदार डॉ. होळी यांच्याकडे दाद मागितली. आमदार डॉ. होळी यांनी पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक लावली. या बैठकीत बंगाली माध्यमांच्या शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
बंगाली शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा
By admin | Updated: August 5, 2016 01:13 IST